राज्याच्या सीमा ओलांडून चित्रपट महोत्सव भरवावेत : सुबोध भावे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

पुणे : महाराष्ट्रासह अन्य राज्यांत व विदेशांतही मराठी भाषक नागरिक बहुसंख्येने स्थायिक झाले आहेत. म्हणूनच मराठी चित्रपट महोत्सव महाराष्ट्रापुरता मर्यादित राहू नये. राज्याच्या सीमा ओलांडून चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केली. 

संवाद पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा पुणे यांच्यातर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित दोन दिवसीय "ऋणानुबंध' महोत्सवाचे उद्‌घाटन भावे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

संग्रहालयाचे संचालक प्रकाश मकदुम, सुनील महाजन, निकिता मोघे, राजूशेठ कावरे, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते. 

भावे म्हणाले, ""नाटक आणि चित्रपट ही वेगळी माध्यमे आहेत. नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना चित्रपट दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला त्या नाटकाचा चित्रपटाच्या दृष्टिकोनातून नक्की कोणता आयाम दिसतो, तो आयाम तो कसा मांडतो, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. अजूनही मराठी भाषेतल्या उत्तम साहित्यावर चित्रपट तयार होऊ शकतात.''

Web Title: Marathi Film Festival should reach out to other states and countries, says Subodh Bhave