न्यायालयीन कामात मराठी अत्यल्प 

दीपेश सुराणा : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पिंपरी - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना अद्यापही मराठी भाषेचा न्यायालयीन कामकाजात अत्यल्प वापर होत असल्याचे चित्र आहे. मुंबई उच्च न्यायालय, राज्य पोलिस दल, पुणे पोलिस दल, राज्य रस्ते विकास महामंडळ, विक्रीकर विभाग, पुणे विद्यापीठ आदी प्रमुख संकेतस्थळावर इंग्रजी भाषेचाच वरचष्मा पाहण्यास मिळतो. ठराविक आदेश, प्रसिद्धिपत्रकेच मराठीत पाहण्यास मिळतात.

न्यायालयीन कामकाजात अद्याप मराठी भाषेचा वापर वाढला नाही. न्यायालयाने काही निकाल मराठी भाषेत देण्यास सुरवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सर्व माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे. राज्य पोलिस दलाच्या संकेतस्थळावर काही ठराविक बाबी वगळता सर्व माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे. पुणे पोलिस दल तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील हीच परिस्थिती आहे.

अभिजात दर्जासाठी झालेले प्रयत्न 
 राज्य सरकारकडून अभिजात मराठी भाषा समितीची १० जानेवारी २०१२ ला स्थापना
 १४ मार्च २०१२ ला मसुदा उपसमितीची स्थापना करून अहवाललेखनाचे काम
 मसुदा उपसमितीच्या १९ बैठका 
 समितीचा अंतिम अहवाल मे-२०१३ मध्ये सादर
 अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा : तमीळ, संस्कृत, तेलगू, कन्नड व मल्याळम.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य सरकारकडे २०१३ मध्ये अंतिम अहवाल अभिजात मराठी भाषा समितीने सादर केला आहे. राज्य सरकारतर्फे आता याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा होणे आवश्‍यक आहे.
- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Web Title: Marathi minimal judicial work