विश्रांतवाडीत खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

येरवडा - शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून तरुणाने पदपथावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्‍यात सिमेंटच्या विटेचा गट्टू घालून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथे घडली. 

अशोक नामदेव भगत ऊर्फ काची सिकंदर (वय 45, रा. मच्छी मार्केट, विश्रांतवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी नीलेश कांबळे (वय 22, रा. आंबेडकरनगर, विश्रांतवाडी) याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल किसन राठोड (22, रा. विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली. 

भगत याने मद्यधुंद अवस्थेत राठोड यास शिवीगाळ केली होती. त्याचा राग राठोड याच्या मनात होता. मंगळवारी रात्री भगत हा आळंदी रस्त्यावरील मच्छी मार्केट परिसरातील पदपथावर झोपला होता. त्या वेळी पहाटे अडीचच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या राठोड याने रस्त्याच्या कडेला पडलेल्या सिमेंटच्या विटेचा गट्टू भगत याच्या डोक्‍यात घालून खून केला. या घटनेनंतर राठोड याने तेथून पलायन केले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे राठोडचा शोध घेतला. 

Web Title: marathi murder crime pune

टॅग्स