असवले इंग्लिश मिडियम स्कूलचे स्नेहसंमेलन संपन्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

टाकवे बुद्रुक - येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारुती असवले हाय इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. काही दानशूर मंडळीने ग्रामीण भागातील विनाअनुदानित शाळेला भरघोस मदतीचा हात पुढे केला. तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

टाकवे बुद्रुक - येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारुती असवले हाय इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. काही दानशूर मंडळीने ग्रामीण भागातील विनाअनुदानित शाळेला भरघोस मदतीचा हात पुढे केला. तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी विरोधी पक्षनेते गणेश भेगडे, नगरसेवक अरूण भेगडे, काळूराम मालपोटे, सरपंच सुप्रिया मालपोटे, उपसरपंच स्वामी जगताप, पोलीस पाटील अतूल असवले, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले आदी उपस्थित होते. 

चिमुरड्याचा जीव वाचविणा-या अंगणवाडी सेविका हिराबाई लष्करी, मदतनीस शोभा गायकवाड, आदर्श सरपंच शरद जाधव, वेटलिफ्टर महेश असवले, सामाजिक संस्था सेवा फाऊंडेशन यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. शाळेतील गुरुजन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा चांगला रंगला. अत्यल्प फी मध्ये इंग्रजीतून शिक्षण देणाऱ्या या शाळेतील विविध उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. दर शनिवारी रविवारी अॅबकस, वेदिक गणित, नृत्य, अभिनय, कला, खेळ, व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी दिली. नियमित विद्यार्थ्याची मोफत आरोग्य तपासणी केली जाते, शैक्षणिक उपक्रमांसह ट्रेकिंग, सहली या गोष्टीवर आवर्जून भर दिला जात असल्याचे मुख्याध्यापक किरण हेंद्रे यांनी स्पष्ट केले. उपक्रमांची शाळा अशी ओळख निर्माण करु पाहणाऱ्या शाळेला मान्यवरांनी मदतीचा हात पुढे केला, हे पाहून पालकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. तानाजी असवले यांनी प्रास्ताविक केले. राजू खांडभोर यांनी सुत्रसंचालन केले. मनोज जैन यांनी आभार मानले. 

Web Title: marathi new pune english school annual program