पुणे - म्हाळूंगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुर भांडे

Mayur-Bhande
Mayur-Bhande

औंध (पुणे) : ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने घेण्यात  आलेल्या म्हाळूंगे ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत सरपंचपदासाठी मयुर तुळशीराम भांडे हे उमेदवार निवडून आले आहेत. आरक्षणाप्रमाणे अनुसुचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदासाठी भांडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अजिंक्य रमेश कांबळे यांचा 84 मतांनी पराभव करत विजयी झाले.

भांडे यांना एकूण 855 तर कांबळे यांना 771 मते पडली. थेट जनतेतून निवड झाल्याने सरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. तर सदस्यपदासाठी झालेल्या निवडीत नागरीकांचा मागास प्रवर्गातून युवराज मोहन कोळेकर यांनी निनाद पाडाळे यांचा 172 मतांनी पराभव केला. युवराज कोळेकर यांना 387 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार निनाद अर्जून पाडाळे यांना 215 मते मिळाली.

सर्वसाधारण जागेसाठी सुखदेव रामदास कोळेकर यांनी सतिश आनंदा पाडाळे यांचा 168 मतांनी पराभव केला, कोळेकर यांना 311 तर पाडाळे यांना 143 मते मिळाली. महिला सर्वसाधारण जागेसाठी बेबी पांडूरंग खैरे यांना 240 तर स्मिता ज्योतिबा पाडाळे यांना 214 मते मिळाली यात बेबी खैरे यांनी स्मिता पाडाळे यांचा 26 मतांनी पराभव केला. सर्वसाधारण महिला झालेल्या निवडीसाठी बेबी शांताराम पाडाळे यांना 256 तर त्रिवेणी अनिल कामठे यांना 251 मते मिळाली यात कामठे यांचा पाच मतांनी पराभव झाला.

नागरीकांचा मागास प्रवर्ग मधून उज्वल विजय पाडाळे यांना 222 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार किरण रामदास पाडाळे यांना 208 मते मिळाली यात किरण पाडाळे यांचा 14 मतांनी पराभव झाला.विवेक गोविंद खैरे यांनी अविनाश पोपट पाडाळे यांचा 61 मतांनी पराभव केला.विवेक खैरे यांना 253 तर अविनाश पाडाळे यांना 192 मते मिळाली.रुपेश सुरेश पाडाळे यांनी मंगश मधुकर पाडाळे यांचा 21 मतांनी पराभव केला रुपेश यांना 218 तर मंगेश यांना 197 मते मिळाली.

आठ उमेदवार बिनविरोध
म्हाळूंगे ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत यापुर्वीच आठ उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले होते. यात अर्चना सागर चिव्हे (अनुसुचित जमाती), सुजाता सुर्यकांत कोळेकर व स्मिता मनोज पाडाळे (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला), अजिंक्य विश्वनाथ कांबळे (अनुसुचित जाती), प्रियंका धनराज कांबळे (अनुसुचित जाती महिला), भाग्यश्री संजय पाडाळे (सर्वसाधारण महिला), पांडूरंग सहादू पाडाळे (सर्वसाधारण), संध्या शशिकांत कांबळे (अनुसुचित जाती महिला). अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत मात्र कुठलाही अनुचित प्रकार न घडता निवड अत्यंत शांततेत पार पडली.पोलीस व  प्रसासनाच्या वतीने चोख सुरक्षा व्यवस्था यावेळी ठेवण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com