चोरीची २१९ वाहने जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

हडपसर - गेल्या ११ जानेवारीपासून परिमंडळ चार विभागाकडून २१९ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर पोलिस ठाण्याने ९२, वानवडी पोलिस ठाण्याने ५४, खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने ५४ आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या पथकाने १९ वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी २१ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

परिमंडळ चारच्या मार्फत वाहनचोरांना पकडण्याची मोहीम राबविण्यात येत असून, यासाठी वाहन चोरी विरोधी पथके स्थापन करण्यात आले आहेत. बुधवारी बालाजी मनोहर मन्नावत (वय ३०, रा. वाखारी, दौंड), शेखर रामचंद्र कुल (वय २०, रा, दौंड), सागर दिलीप जगताप (वय ३६, रा. खोपवाडी, ता. बारामती), सतीश वामन कुल (य ३०, रा, दौंड) यांना अटक केली असून त्यांच्याकडून २३ वाहने जप्त करण्यात आली असून त्यात एका कारचा समावेश आहे. 

वानवडी विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजूम बागवान, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे, रवींद्र बागूल, नितीन मुंडे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सौदाबा भोजरावस राजेश नवले, युसूफ पठाण यांचा या पथकांत समावेश आहे. 

‘तक्रार ॲप’चीही मदत
वाहन चोरीस प्रतिबंध घालण्यासाठी त्रिस्तरीय योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये फिक्‍स पॉइंट, नाकाबंदी, दुचाकी वाहनावरून वाढीव गस्त घालणे आदी उपाययोजना केल्या आहेत. सदर पथके पुणे व शहरालगतच्या भागात तसेच इतर जिल्ह्यांत रवाना करण्यात आले. या पथकांनी आष्टी, जामखेड, राशीन, कर्जत, पाटस, यवत, कुरकुंभ, दौंड, काष्टी, श्रीगोंदा, चाकण, खेड, सासवड, जेजुरी, लोणंद या भागात गोपनीय माहिती व वाहनचोरी तक्रार ‘ॲप’चा वापर करून वाहने चोरणाऱ्यांवर पाळत ठेवली. 

वाहन चोरी करणारे आरोपी हे सुशिक्षित आहे. शहरात कामानिमित्त आल्यानंतर ते वाहने चोरून नेत. ग्रामीण भागातील कमी उत्पन्न गटातील लोकांना ही वाहने कमी किमतीत विकण्याचे काम ते करत. हे सर्व आरोपी नवीन असून त्यांच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाहीत.
- विष्णू पवार, पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे

Web Title: marathi news 219 vehicles of theft seized hadapsar crime