‘‘बालगंधर्व’ पाडू नका’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे - ‘‘बालगंधर्व रंगमंदिर हे आम्हा कलावंतांसाठी मंदिरासारखे आहे. या ऐतिहासिक वास्तूवर रसिक-कलावंतांचा जिव्हाळा असून, महापालिकेने त्याला जमीनदोस्त करण्याचा विचार सोडून द्यावा,’’ अशी मागणी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेख साखवळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. मंडळाचे कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची वास्तू पाडून नवी इमारत उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पण याला रसिक आणि कलावंतांकडून विरोध होत आहे. मंडळानेही याला विरोध दर्शविला आहे. साखवळकर म्हणाले, ‘‘बालगंधर्व रंगमंदिर कलावंतांच्या अंतःकरणात वसले आहे. या ऐतिहासिक वास्तूला पाडण्याचा विचार महापालिकेने सोडून द्यावा. रंगमंदिराच्या बाहेरून कॉलम टाकून बहुमजली इमारत उभी करावी किंवा रंगमंदिराच्या परिसरात विशेषतः रिकाम्या जागेवर नवी इमारत उभी करावी; पण जुन्या इमारतीला धक्काही लावू नये. याबाबत आम्ही महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिले आहे.’’

Web Title: marathi news Balgandharva Rangmandir pune PMC