बारामतीत भीमसैनिकांनी विराट मोर्चा काढून केला निषेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच सिध्दार्थनगर परिसरात भीमसैनिक जमले होते. तेथून विराट मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरुन इंदापूर चौक मार्गे कसब्यापर्यंत गेला. तेथून गुनवडी चौकातून गांधी चौक मार्गे हा मोर्चा नगरपालिकेसमोर आला. मोर्चामध्ये महिलांसह आबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान सर्वांनीचा या घटनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

बारामती : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत भीमसैनिकांनी विराट मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. बारामती शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे पडसाद कालपासूनच बारामतीत उमटत होते. काल रात्री चार ते पाच बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. 

आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच सिध्दार्थनगर परिसरात भीमसैनिक जमले होते. तेथून विराट मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरुन इंदापूर चौक मार्गे कसब्यापर्यंत गेला. तेथून गुनवडी चौकातून गांधी चौक मार्गे हा मोर्चा नगरपालिकेसमोर आला. मोर्चामध्ये महिलांसह आबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान सर्वांनीचा या घटनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये विविध मान्यवरांनी कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या प्रकरणी ज्यांनी हा प्रकार घडवून आणला त्यांच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. 
या प्रसंगी साधू बल्लाळ, जब्बार पठाण, धीरज लालबिगे, नितीन थोरात, अविनाश गायकवाड, मुनीर तांबोळी, आरती शेंडगे, मंगलदास निकाळजे, अनिकेत मोहिते, अमर धुमाळ, इम्तियाज शिकीलकर, विनोद जगताप, चंद्रकांत खंडाळे, भाऊ मांढरे, अँड. विनोद जावळे, आनंद थोरात, सुरेखा बगाडे, दत्ता लोंढे, प्रशांत पवार, नवनाथ बल्लाळ, वनिता बनकर, कैलास चव्हाण, भारत अहिवळे, विजय गव्हाळे, काळूराम चौधरी, सुधीर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान या मोर्चास अनेक संस्था व संघटना यांनी पाठिंबा दर्शविला. विविध  संस्था व संघटनांचे पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले होते. 

Web Title: Marathi news Baramati news bandh in Baramati