दलितवस्ती सुधार योजनेंर्तगत बारामती तालुक्याला 2 कोटी 26 लाख

दलितवस्ती सुधार योजनेंर्तगत बारामती तालुक्याला 2 कोटी 26 लाख

शिर्सुफळ (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेंच्या अंर्तगत बारामती तालुक्यातील विविध ठिकाणच्या 39 विकास कामांच्या साठी 2 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. यामाध्यमातुन अंर्तगत रस्ते, सौरपथ दिवे बसविणे, भूमिगत गटारे, समाज मंदिरे यांची कामे संबंधित भागात करण्यात येणार आहेत.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातुन दलित वस्त्या घोषित करुन त्यांच्या विकास कामांच्यासाठी आराखडा तयार करण्याबाबत सुचित करण्यात आले होते. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या विकास आरखड्याला प्रादेशिक उपायुक्त यांनी मंजुरी दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन दलित वस्ती सुधार योजनेंर्तगत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या मूलभुत गरजा भागविण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील 39 प्रस्तावित कामांच्या साठी 2 कोटी 26 लाख 11 हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदर कामे ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातुन करण्यात येणार आहेत.यामध्ये बांधण्यात येणाऱ्या समाज मंदिरांच्या पूर्णत्वानंतरची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतींना करावी लागणार आहे. तसेच सदर कामे मंजूर असलेल्या भागांमध्येच करावी लागणार आहेत.

यामध्ये बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी येथील खंडूखैरेवाडी येथे सौरपथ दिवे बसविणे (5 लाख) व निरावागज गावठाण दलितवस्ती समाजमंदिर (7 लाख 90 हजार) या कामांसह रस्ता काँक्रेट करणाची कामे मंजुर झालेल्या गावाचे नाव, वस्तीचे नाव व निधी पुढील प्रमाणे -
1) शिरष्णे गावठाण (4 लाख 99 हजार),
2) काटेवाडी मासाळवाडा (2 लाख 85 हजार),
3) ढाकाळे गावठाण (15 लाख),
4) अंजनगाव कृष्णाई फार्मवस्ती (2 लाख),
5) माळेगाव बुद्रुक ढाळे आळी (13 लाख), साठेनगर (13 लाख 12 हजार), 
6) घाडगेवाडी शाहु फुले आंबेडकर नगर (2 लाख),
7) करणेवाडी सगोबावस्ती (7 लाख 16 हजार),
8) निरावागज भोसलेवस्ती काळबाचा वाडा (4 लाख 99 हजार),भोसलेवस्ती (3 लाख),
9) कोऱ्हाळे खुर्द चर्मकार मातंग वस्ती (4 लाख 99 हजार),
10) मळद शिवाजीनगर (4 लाख),
11) मेखळी जांबळी फाटा (4 लाख 99 हजार),
12) बऱ्हाणपूर गावठाण ( 5 लाख), आंबेडकर नगर (5 लाख),
13) पिंपळी लिमटेक गावठाण दलितवस्ती (2 लाख 99 हजार),
14) पाहुणेवाडी दत्तोबानगर (3 लाख 8 हजार),
15) सावळ लक्ष्मीनगर (2 लाख 50 हजार), 
16) कऱ्हावागज गावठाण (4 लाख 97 हजार),
17) सिध्देश्वर निंबोडी सोनवणे वस्ती गावठाण (4 लाख 99 हजार), तुकाईवाडी नंबर 2 (5 लाख 1 हजार),
18) सोनवडी सुपे आंबेडकर नगर (5 लाख),
19) कारखेल साठेनगर (3 लाख)  
20) ढेकळवाडी येथील हालगेवाडी ( 7 लाख 16 हजार)
---
भूमिगत गटार योजना मंजुर असलेल्या गावचे नाव वस्तीचे नाव व निधी पुढीलप्रमाणे- 
1) गुणवडी पाऊतकानगर (15 लाख), ढेलेवस्ती भूमिगत (14 लाख 64 हजार),
2) जैनकवाडी डोईफोडे वस्ती (8 लाख),   
3) माळेगाव बुद्रुक बौध्दनगर (7 लाख 90 हजार), लकडेनगर भूमिगत गटार ( 7 लाख 90 हजार), 
4) कोऱ्हाळे बुद्रुक कांबळे वस्ती (3 लाख 95 हजार),
5) मानाप्पावस्ती येथील लकडे वस्ती (5 लाख),
6) पिंपळी लिमटेक गावठाण दलितवस्ती (1 लाख 80 हजार)
7) गोजुबावी साठेनगर (4 लाख 98 हजार), कदमवस्ती (1 लाख 12 हजार), पंचशिलनगर (4 लाख 99 हजार),
8) कुरणेवाडी गावठाण (2 लाख 20 हजार),
9) चौपडज लक्ष्मीनगर (5 लाख)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com