बारामतीत पोलिसांकडून सराईत गुन्हेगारास अटक

मिलिंद संगई
रविवार, 21 जानेवारी 2018

बारामतीतील ढवाण चौकात नंबरप्लेट नसलेल्या मोटारसायकलवरुन जाणाऱ्या एका युवकावर गुन्हे शोध पथकातील पोलिसांना संशय आला. त्याला थांबण्यास सांगूनही तो पळून जाऊ लागल्यावर पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले. 

बारामती : गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतूसे बाळगलेल्या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांनी काही गुन्हे उघड केले आहेत. बारामतीच्या गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली. 

बारामतीतील ढवाण चौकात नंबरप्लेट नसलेल्या मोटारसायकलवरुन जाणाऱ्या एका युवकावर गुन्हे शोध पथकातील पोलिसांना संशय आला. त्याला थांबण्यास सांगूनही तो पळून जाऊ लागल्यावर पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले. 

महेश उर्फ मन्या गणेश इंगळे (वय 19, रा. गणेश अपार्टमेंट, तांदुळवाडी रोड, बारामती)  असे त्याचे नाव आहे.
त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे मिळाली. तसेच तो ज्या स्प्लेंडर मोटारसायकलवरुन आला तीदेखील त्याने फलटण येथून चोरुन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्यावर यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी, चोरी असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. महेश इंगळे यास सोमवारपर्यंत (ता. 22) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखऱ यादव, पोलिस हवालदार शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, अनिल काळे, रविराज कोकरे, संदीप मोकाशी, संदीप जाधव, संदीप कारंडे, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, शर्मा पवार, सदाशिव बंडगर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Marathi news Baramati news one criminal arrested