बारामती - तयार वाहनतळ वापरण्यासाठी कधी चालू करणार?

मिलिंद संगई
गुरुवार, 15 मार्च 2018

बारामती : शहरातील इंदापूर व गुनवडी चौकातील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी या उद्देशाने गणेश मार्केटवर उभारण्यात आलेला भव्य पार्किंग तळ नगरपालिकेकडून सुरु केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन तयार केलेल्या या पार्किंग तळावर दोनशे चार चाकी तर चारशे दुचाकी गाडी पार्किंग करता येणार आहे. इंदापूर व गुनवडी चौकादरम्यान सातत्याने वाहतूकीची कोंडी होते, मंडईच्या चारही रस्त्यांवरचे पार्किंग काढून ते मंडईच्या वरील बाजूस करण्यासाठी नियोजन करुन तसा पार्किंग तळ तयार केला गेला. 

नवीन मंडईचे उद्घाटन होऊन आता सहा  महिन्यांचा कालावधी उलटूनही पार्किंग तळ का सुरु केला जात नाही याचे उत्तर कोणाकडेच नाही. हे पार्किंग सुरु केले तर रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱ्या गाड्या या तळावर लावता येतील व चौकातील वाहतूकीचा ताण आपोआपच कमी होईल. 

गणेश मार्केटची उभारणी केल्यानंतर जो पर्यंत कंत्राटदाराचे काम सुरु होते तो वर येथे चोऱ्या झाल्या नाहीत. मात्र इतक्या मोठ्या वास्तूच्या सुरक्षेची जबाबदारी नगरपालिकेची असताना या बाबत सुरक्षा व्यवस्था न पुरविल्याने नगरपालिकेचे नुकत्याच झालेल्या चोरीमुळे आर्थिक नुकसान झाले. इलेक्ट्रीक सामानासह प्लंबिंग मटेरियल चोरट्यांनी चोरुन नेले तर नासधूसही करण्यात आली. 

कोट्यवधींचा खर्च करुनही नगरपालिकेकडून पार्किंगतळाबाबत भूमिका घेतली जात नसेल तर इतका खर्च कशासाठी केला गेला असा ही प्रश्न आता उपस्थित होत आहे. 
शहरातील नगरपालिकेच्या मालकीचे अनेक गाळे व हॉल वर्षानुवर्षे रिकामे पडून आहेत, त्याचे मूल्य निश्चित करुन त्याचे फेरलिलाव का केला जात नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. प्रशासकीय प्रक्रियेला होणारी दिरंगाई ही नगरपालिकेचे आर्थिक नुकसान करणारी ठरत असतानाही या कडे कोणी फार गांभीर्याने पाहत नाही असेच चित्र आहे. एकीकडे नगरपालिका रिकाम्या गाळ्यांचा लिलाव करण्यास उदासिन भूमिका घेत असताना दुसरीकडे पोटभाडेकरु ठेवून काही जण महिन्याला काही हजारात वाढीव उत्पन्न खिशात घालत आहेत. 

Web Title: Marathi news baramati news parking still not open for users