महिला दिनानिमित्त सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडींग मशीनचे उद्घाटन

मिलिंद संगई
शुक्रवार, 9 मार्च 2018

बारामती (पुणे) : स्वच्छता आणि आरोग्याचा निकटचा संबंध आहे. सॅनिटरी नॅपकिन्स बाबत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर विविध माध्यमातून जनजागृती होत असून महिलांनीही स्वच्छतेबाबत जागरुक राहायला हवे, अशी अपेक्षा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. 

विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडींग मशीनचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे एकूण विद्यार्थी संख्येपैकी 61 टक्के विद्यार्थीनी आहेत तर 39 टक्के विद्यार्थी आहेत. मुलींची संख्या या महाविद्यालयात अधिक असल्याने सॅनिटरी नॅपकिन व्हेडींग मशीन तसेच वापरलेल्या नॅपकिन्सची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे मशीन महाविद्यालयात बसविण्यात आले आहे. 
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या साठी हा निर्णय महाविद्यालयाने घेतला असल्याचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी नमूद केले. विद्यार्थींनींचे या बाबत महिला प्राध्यापकांकडून प्रबोधन केले जात असून मुलींना स्वच्छता व आरोग्यविषयक माहिती वेळोवेळी देण्याचाही महाविद्यालयाकडून प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

सुनेत्रा पवार यांनीही या प्रसंगी विद्यार्थींनीनी माहिती नसेल तर त्या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करावा व स्वच्छतेबाबत कधीच तडजोड करु नये असे सांगितले. 

Web Title: Marathi news baramati news sanitary napkins vending machine