कामाच्या ठिकाणी महिलांनी विशाखा समितीची मदत घ्यावी

मिलिंद संगई
शुक्रवार, 9 मार्च 2018

बारामती (पुणे) : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण होत असेल तर महिलांनी या बाबत शांत न राहता या बाबतची कल्पना संबंधितांना द्यायला हवी असे प्रतिपादन अॅड. प्रिया गुजर महाडीक यांनी केले. बारामती नगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या विरोधातील कायदे या बाबत प्रिया गुजर महाडीक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्य प्रसंगी गुजर यांनी ही माहिती दिली.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, सभापती सुरेखा चौधर, उपसभापती सीमा चिंचकर यांच्यासह अनेक नगरसेवक व महिला या प्रसंगी उपस्थित होत्या. प्रिया गुजर महाडीक म्हणाल्या, ज्या ठिकाणी दहा पेक्षा अधिक महिला कर्मचारी कार्यरत असतात, अशा ठिकाणी कायदयान्वये विशाखा समितीची स्थापना करणे अनिवार्य असते. यात सात सदस्यांचा समावेश हवा त्यात चार महिला हव्यात व एक त्रयस्थ सदस्य गरजेचा आहे.

हल्ली सोशल मिडीयाचा मुक्तपणे वापर सुरु असतो, तेव्हा पुरुषांनी महिलांना मेसेज पाठविताना विचारपूर्वकच मेसेज पाठवावेत, जर महिलांना यातील काहीही अश्लिल किंवा आक्षेपार्ह वाटले तर त्या विशाखा समिती कडे तक्रार करु शकतात, ही समिती संबंधित तक्रारीची शहानिशा करुन त्यात निर्णय घेते. महिलांना कामाच्या ठिकाणी सतत बोलणे, अपमान करणे किंवा त्यांना मानसिक त्रास दिल्यासही महिला दाद मागू शकतात. महिलांकडे नुसते चुकीच्या पध्दतीने पाहिले तरीही महिला त्या बाबत तक्रार करु शकतात. अर्थात महिलांनी खोटी तक्रार दिल्यास व ती सिध्द झाल्यास संबंधित महिलेविरुध्दही कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रसंगी महिलांबाबत इतर कायद्यांचीही प्रिया गुजर यांनी माहिती दिली. महिलांनी अन्याय सहन न करता कायद्याची मदत घेऊन सुरक्षित जीवन व्यतित करावे असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Marathi news baramati news vishakha committee