इंदापूरमध्ये बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

राजकुमार थोरात
मंगळवार, 20 मार्च 2018

वालचंदनगर - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने इंदापूर शहरामध्ये शुक्रवार (ता.२३ मार्च) रोजी नवजात बालकांपासून ते पंधरावर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे प्रवीण माने यांनी याबद्दल माहिती दिली.

एस. एस. रहेजा हॉस्पिटल संचलित फोर्टिंज ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मेन्टोर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये १५ वर्षापर्यंत बालकांची मोफत हृदयाची तपासणी करण्यात येणार असून, शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्यास मुंबईमधील एस.एस.रहेजा हॉस्पिटल मध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. इंदापूर शहरातील राऊत हॉस्पिटलमध्ये शुक्रवार (ता.२३)रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीमध्ये शिबीर होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले असून, जास्ती पालकांनी मुलांच्या आरोग्याच्या तपासणी करुन घेण्याचे आवाहन माने यांनी केले आहे.  

Web Title: marathi news baramati supriya sule heart disease