सहकाररत्न उत्तमराव काळे प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार

प्रशांत चवरे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

भिगवण : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी समाजासाठी प्रचंड मोठे काम केले म्हणून शेकडो वर्षानंतरही आपण त्यांचे नाव घेतो. आजही सामाजिक राजकिय क्षेत्रामध्ये काम करत असताना भ्रष्टाचार व अहंकाराचा वारा बाजुला ठेवून कार्य केल्यास ते समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन माजी खासदार विदुरा नवले यांनी केले.

डिकसळ (ता.इंदापुर) येथील जिल्हा वस्ताद शिवाजी काळे प्रतिष्ठान व सहकाररत्न उत्तमराव काळे फाऊंडेशन यांचे वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कायर्क्रमांमध्ये ते बोलत होते. माळेगांव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, माजी सभापती मयुरसिंह पाटील, माजी सभापती रमेश जाधव, हनुमंत वाबळे, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, अशोक शिंदे, डिकसळचे सरपंच सुर्यकांत सवाणे, उपसरपंच सायली गायकवाड उपस्थित होते. 

नवले पुढे म्हणाले, उत्तमराव काळे यांनी या भागातील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आदर्शवत कार्य केले आहे त्यांचा आदर्श इतरांनी समोर ठेवावा. यावेळी श्रेया काळे, सोनिया कुंभार, स्मिता शिंदे, आबोली गवळी, शुभम काळे, पायल कुंभार, अभिषेक गदादे, तेजल देवकाते, सुरज कदम, अजित शेलार, सुर्यकांत सवाणे, सायली गायकवाड, मारुती शिंदे, लताबाई काळे, लक्ष्मण कुंभार, पांडुरंग वाघ, अशोक मोरे, ज्ञानदेव निमजकर, महादेव काळे, निळकंठ राठोड, भरत मल्लाव, सुधीर पानसरे, दत्तात्रय शेलार, मधुकर ताटे, प्रकाश ढवळे, हनुमंत वाबळे आदी गुणवंताचा सन्मान करण्यात आला. यावेळी चंद्रराव तावरे, मयुरसिंह पाटील, रमेश जाधव, माणिकराव गोते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिवदास सुर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी केले तर आभार अनिल काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन सतीश काळे, सुनिल काळे आदींनी केले. 

Web Title: Marathi news bhigwan news award