कॅनरा बॅंक शेती व उद्योगाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल- आर.के.स्वाइॅं 

प्रशांत चवरे
मंगळवार, 13 मार्च 2018

भिगवण (पुणे) : कोणत्याही भागाच्या विकासामध्ये वित्तीय संस्थाचे मोठे योगदान असते. बॅंक ही खऱ्या अर्थाने विकासाची गुरुकिल्ली असते. कॅनरा बॅंकेच्या देशाभरामध्ये सहा हजार सहाशे पेक्षा अधिक शाखा आहेत. बॅंकींग सेवा ही देणारी देशातील अग्रणी बॅंक आहे. कॅनरा बॅंक  भिगवण व परिसरातील शेती, उद्योग व सेवा क्षेत्राच्या विकासांमध्ये महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास कॅनरा बॅंकेचे महाव्यवस्थापक आर.के.स्वाइॅं यांनी व्यक्त केले.

येथील कॅनरा बॅंकेच्या शाखा उद्घाटन समारंभामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव होते तर कार्यक्रमासाठी सरव्यवस्थापक एस.प्रेमकुमार, क्षेत्रीय प्रबंधक पी.आर. मिश्रा, प्रबंधक सुधीर जाधव, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक केशव जगताप, प्रकाश ढवळे, माजी सरपंच पराग जाधव, महेंद्र बोगावत, अशोक शिंदे, संजय रायसोनी, अभिमन्यु खटके, तानाजी जगताप, मानसिंग जाधव व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाइॅं पुढे  म्हणाले, कॅनरा बॅंकेची सुरुवात 1906 रोजी झाली आहे. उत्तम सेवा दिल्यामुळे कॅनरा बॅक ही देशातील आघाडीची बॅंक आहे. या शाखेच्या माध्यमातूनही ग्राहकांनाही उत्तम सेवा देण्यात येईल.    

कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश जाधव म्हणाले, भिगवण हे गाव पुणे, सोलापुर व अहमदनगर जिल्ह्यांच्या सिमारेषवर असलेले जिल्ह्यामध्ये वेगाने प्रगती करत असलेले गांव आहे. उजनी जलाशयामुळे शेती व राष्ट्रीय महामार्गामुळे व्यवसायाला येथे मोठी संधी आहे. कॅनरा बॅक ही बॅंकीग क्षेत्रातील नावाजलेली बॅंक आहे. या बॅंकेने नवीन शाखेसाठी भिगवणची निवड केल्यामुळे येथील ग्राहकांना अर्थसहाय्य मिळण्यास निश्चित मदत होणार आहे. बॅंक व ग्राहकांनी एकमेकांबद्दल विश्वास निर्माण केल्यास बॅंकेची व या भागातील नागरिकांचीही प्रगती होण्यास मदत होईल.

यावेळी अकरा खातेदारांना लघु व्यवसाय व पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. शाखेच्या शुभारंभाच्या दिवशी सुमारे 250 खातेदारांनी खाते उघडुन उत्तम प्रतिसादन दिला. यावेळी एस.प्रेमकुमार, पी.आर. मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बॅंकेचे शाखा व्यवस्थापक नितीन गवले यांनी केले सुत्रसंचालन अभिजीत जगदाळे यांनी केले तर आभार प्रशांत भोयार यांनी मानले.

Web Title: Marathi news bhigwan news canara bank farming industry development