भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार

सुदाम बिडकर
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट यांचा सन 2016-17 करिता मध्य विभागातील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज मंगळवारी प्रदान करण्यात आला. मांजरी बुद्रुक (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2016-17 गाळप हंगामासाठी विविध विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यातील कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट यांचा सन 2016-17 करिता मध्य विभागातील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज मंगळवारी प्रदान करण्यात आला. मांजरी बुद्रुक (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2016-17 गाळप हंगामासाठी विविध विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यातील कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, 
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहीते पाटील, सतेज पाटील, राजेश टोपे, शंकरराव कोल्हे, कल्लापण्णा आवाडे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, इस्पाचे (नवी दिल्ली) उपाध्यक्ष रोहीत पवार उपस्थित होते. 

पुरस्काराचा स्विकार भीमाशंकरचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक देवदत्त निकम, बाळासाहेब घुले, बाबासाहेब खालकर, ज्ञानेश्वर गावडे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, भगवान बोऱहाडे, रमेश कानडे, उत्तम थोरात, तानाजी जंबुकर, माऊली आस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकीनी हांडे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, कार्यालयीन अधिक्षक रामनाथ हिंगे, राजेश वाकचौरे यांनी केला. पुरस्काराबाबत आधिक माहिती देताना उपाध्यक्ष श्री. बेंडे म्हणाले आर्थिक वर्षात कारखान्याने केलीली कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलीली गुंतवणुक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ठेवीची पासबुके, संचीत नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध नीधी, विनीयोगासाठी केलेले नियोजन या सर्व बाबींचा विचार करुन कारखान्यास पुरस्कार मिळाला आला आहे. 
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे सुयोग्य मार्गदर्शन, संचालक मंडाळाचे धोरण, आधिकारी, कामगार, ऊस उत्पादक, सभासद यांनी एकत्रित काम केल्याने कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कारखान्यास आजपर्यंत देशपातळीवरील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना पुरस्कार तीन वेळा, तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार तीन वेळा, ऊस विकास पुरस्कार एक वेळा, चाचणी हंगामात जास्तीत जास्त गाळपाचा पुरस्कार एक वेळा तसेच राज्य पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार पाच वेळा, आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार तीन वेळा, ऊस विकास पुरस्कार एक वेळा असे राष्ट्रीय पातळीवरील आठ व राज्य पातळीवरील नऊ असे एकुण 17 पुरस्कार प्राप्त झाल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी सांगितले.   

 

Web Title: Marathi news bhimashankar sugar factory wins an award