निरवांगीचा पूलावरती दोन्ही बाजूने खचला; अपघाताचा धोका 

राजकुमार थोरात 
सोमवार, 8 जानेवारी 2018

वालचंदनगर - निरवांगी (ता.इंदापूर) येथे बीकेबीएन रस्त्यावरती ओढ्यावरती असलेला पुल खचला आहे. ठेकेदाराने गेल्या एक महिन्यापासून पुलाचे काम बंद ठेवल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. निरवांगी येथे बीकेबीएन रस्त्यावर अनेक वर्षापूर्वीचा जुना पूल आहे. या पुलाचा वापर पुणे व सोलापूर जिल्ह्यातील नागरीक करीत असतात. 

वालचंदनगर - निरवांगी (ता.इंदापूर) येथे बीकेबीएन रस्त्यावरती ओढ्यावरती असलेला पुल खचला आहे. ठेकेदाराने गेल्या एक महिन्यापासून पुलाचे काम बंद ठेवल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. निरवांगी येथे बीकेबीएन रस्त्यावर अनेक वर्षापूर्वीचा जुना पूल आहे. या पुलाचा वापर पुणे व सोलापूर जिल्ह्यातील नागरीक करीत असतात. 

बारामतीहून बावडा, अकलूज व पंढरपूर व सोलापूर जाण्यासाठी केला जातो. पुलावरुन दररोज हजारो वाहन ये-जा करीत असतात. गेल्या काही महिन्यापूर्वी पुलाला मध्यभागी भगदाड पडून पूल मधोमध खचू लागला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या मार्फत पुलाच्या दुरुस्तीला सुरवात केली आहे. मात्र दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरु आहे. गेल्या एक महिन्यापासून पुलाचे काम बंद आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला खडी, वाळू, माती टाकलेली असल्यामुळे पुलावरुन ये-जा करणारी वाहतुक एका बाजूने बंद करण्यात आली आहे. पुलाची एक बाजू खचलेली असताना दोन दिवसापूर्वी पुलाची दुसरी बाजूही खचली असून पूल धोकादायक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या ठिकाणी माती व मरुम भरण्याचे काम केले असून पुलाचा दुसरी बाजू कोणत्याही खचू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाच्या कामाकडे असलेले दुर्लक्षामुळे या रात्रीवेळी पुलावरती मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे तांत्रिक अभियंता गणपत पाटील यांनी सांगितले की, वरिष्ठ कार्यालयाकडून पुलाच्या दुरुस्तीचे ड्राईंग आले नसल्यामुळे काम बंद ठेवले असल्याचे सांगितले.

माणसं मेल्यावर दुरुस्ती करणार का? 
निरवांगी येथे पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या एक महिन्यापासून पुलावरील वाहतूक एका बाजूने बंद करुन रस्त्यावर खडी, मुरुम टाकला आहे. आत्तापर्यंत येथे दोन लहान अपघात झाले असून पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून पुलावरती अपघात होवून माणंस मेल्यावर दुरुस्ती करणार का? असा प्रश्‍न निरवांगीचे सरपंच दशरथ पोळ यांच्यासह ग्रामस्थ विचारु लागले आहेत. 

Web Title: marathi news The bridge over the BKBN road over Nirvangi