ब्रेक निकामी होऊन बसचा अपघात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

बिबवेवाडी - अप्पर येथे उताराच्या रस्त्यावर पीएमपीएलच्या बसचे ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातामध्ये बसचालकासह प्रवाशी जखमी झाले आहेत. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सुखसागर नगरमधून बाहेर पडलेली बस अप्परच्या उताराच्या रस्त्यावर आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. बसचालक व वाहकाने बसमधून जोरजोरात ओरडून रस्त्यावरील लोकांना सावध केले. बसचालकाने उतारावरील डॉल्फिन चौकातील डॉल्फिनच्या शिल्पाला बस धडकवून बस थांबवली. बसचालक व एक प्रवासी धडकेमुळे जखमी झालेले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Web Title: marathi news bus accident break fail