संरक्षणमंत्री घेणार 62 कॅंटोन्मेंटची बैठक : खंडेलवाल  रेडझोन, लष्करी हद्द व मालकीच्या तंट्यावर होणार चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

देहूरोड : नवी दिल्लीतील संसद भवनात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देहूरोड येथील रेडझोन, लष्करी हद्द व मालकीच्या मुद्‌द्‌यावरून सुरू असलेल्या तंट्यावर तोडगा काढण्यासाठी 15 जानेवारीला कॅंन्टोन्मेंट मुख्याधिकारी आणि उपाध्यक्ष यांची बैठक बोलावणार आहे, असे आश्‍वासन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्याची माहिती कॅंन्टोन्मेंट उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी दिली. 

शिष्टमंडळात उपाध्यक्ष खंडेलवाल, कॅंन्टोन्मेंट सदस्य राहुल बालघरे, हाजीमलंग मारीमत्तू, गोपाळ तंतरपाळे, रघुवीर शेलार व अमोल नाईकनवरे यांचा समावेश होता. बुद्धविहार, महावितरण सब-स्टेशनच्या जागेचा प्रश्न किन्हई व शेलारवाडी शाळा बांधकामप्रश्नी बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. यावर काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सीतारामन यांनी दिले. 

चर्चेदरम्यान 15 जानेवारीला देशातील 62 कॅंटोन्मेंट बोर्डांची बैठक बोलवून सर्व सीईओसह विद्यमान उपाध्यक्ष आणि दिल्लीच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात येईल व बैठकीत रेडझोन प्रश्नासह इतर समस्यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यासाठी सर्व बोर्डांच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडला जाईल व ठराव मंजूर करण्यात येतील. रेडझोनचे प्रश्न लष्करी हद्द व मालकीच्या मुदद्यावरून असलेले तंटे सुटण्यासाठी उच्चस्तरीय पातळीवर बैठकांचे सत्र होईल, असा दिलासाही संरक्षणमंत्र्यांनी दिल्याचे उपाध्यक्ष खंडेलवाल यांनी सांगितले. 

Web Title: marathi news cantonment meeting defence minister