रसायनांमुळे इंद्रायणी नदी तांबडी

अनंत काकडे
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

चिखली - तळवडे परिसरातील काही कंपन्यांमधून इंद्रायणी नदीत रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा रंग तांबडा झाला असून, देहूपासून आळंदीपर्यंत पाण्यावर रसायनांचा तवंग पसरला आहे. 

नदीतील रसायनमिश्रित पाणी पिल्याने काही दिवसांपूर्वी दोन म्हशी मृत्युमुखी पडल्या होत्या. आता आठ दिवसांवर तुकाराम बीजसोहळा आला आहे. त्या निमित्ताने लाखो भाविक देहू, आळंदीत येणार आहेत. तीर्थ म्हणून अनेक जण इंद्रायणी नदीत स्नान करतात. पाणी प्राशन करतात. त्यामुळे नदीतील हे प्रदूषित पाणी भाविकांच्या जिवाला धोका निर्माण करू शकते. त्यामुळे आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे.

तळवडे परिसरातील काही कंपन्यांमधून रात्री महापालिकेच्या सांडपाणी वाहिनीत रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. ते तळवडे स्मशानभूमीजवळील सांडपाणी वाहिनीतून थेट नदीपात्रात जाते. त्यामुळे नदीतील पाण्याचा रंग बदलला असून, ते पाणी तांबडे, लाल दिसत आहे. नदीतील दगडगोट्यांचाही रंग बदलला आहे. हा तवंग तळवडे, चिखली, मोशी, आळंदीपर्यंत दिसून आला; तसेच नदीपात्राजवळ गेल्यानंतर पाण्याचा उग्र वास येतो.

काही दिवसांपूर्वी चिखली, तळवडे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले होते. रसायन मिसळल्याने पाण्यात जलचर दिसत नाहीत. शिवाय चेंबरमधून हे पाणी रात्री सोडले जात असल्याने नेमके कोणत्या कंपनीतून पाणी सोडले गेले, याचा शोध लावणे अवघड आहे. नदीपात्रात पाणी पडते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेस निर्माण होतो. गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

रसायनमिश्रित पाण्याबाबत महापालिका व प्रदूषण मंडळाला कळविले आहे. त्यांच्याकडून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत आहे.
- विजय तापकीर, वैभव मोरे, सामाजिक कार्यकर्ते

सोमवारपासून तळवडे ते चऱ्होली परिसरातील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी टप्प्याटप्प्याने काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- मनोज लोणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी   

सर्कल मार्फत नदीची पाहणी केली जाईल. त्याबाबत संबंधित विभागाला कळवून कारवाई करण्यात येईल.
- गीतांजली शिर्के, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड

प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी नदीला भेट देतील. संबंधित कंपन्यांवर त्वरित कारवाई करण्यात येईल.
- जे. एस. साळुंके, अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ

Web Title: marathi news chikhali news indrayani river pollution chemical