संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

खडकवासला  - पुणे येथील नऱ्हे येथे संगणक अभियंता तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली असल्याचे मंगळवारी उघडकीस आले. सिंहगड रस्ता पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे

खडकवासला  - पुणे येथील नऱ्हे येथे संगणक अभियंता तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली असल्याचे मंगळवारी उघडकीस आले. सिंहगड रस्ता पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे

समीर दशरथ पांचाळ( वय 28) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो नऱ्हे येथील मानाजी नगर येथील वैष्णवी इमारतीत राहत होता.  पत्नी गावाला गेल्याने त्याने किचन मधील पंख्याच्या हुकाला दोरी, ओढणीने गळफास घेतला आहे. नातेवाईकांनी त्याच्या फोनवर फोन लावला असता. तो उचलत नसल्याने नातेवाईक घरी आले. त्यावेळी, त्यांना घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 
पोलिसांनी दार उघडले असता. त्याने आत्महत्या केल्याची दिसले. समीरचा मृतदेह कुजलेला असल्याने वास येत होता. यावरून त्याने दोन चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी. दरम्यान, पती पत्नी मध्ये आठ दिवसापूर्वी भांडण झाले होते. त्याबाबत तिने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर ती माहेरी गेली असताना त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज सिंहगड रस्ता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: marathi news Computer Engineers Suicide sameer panchal pune Khadakavasala