पोपटांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - पोपटांची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी वन्यजीव संरक्षण कायदा, तसेच प्रोटेक्‍शन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल्स कायद्यानुसार अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांनी दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

निहाल शशिकांत चव्हाण (रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) आणि अरसलान मुश्रफ शेख (गणेशनगर, बोपखेल) अशी कोठडी सुनावण्यात  आलेल्यांची नावे आहेत. याबाबत आदित्य दिनकर पाटील (रा. गंगा विष्णू अपार्टमेंट, गणेशनगर, बोपखेल) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येरवडा सादलबाबा दर्गा येथील फुटपाथवर दोघे जण बेकायदेशीररीत्या चार पोपट विक्री करीत आहे. अधिक तपासासाठी दोघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली होती. ती न्यायालयाने मंजूर केली आहे.

Web Title: marathi news crime parrots sale pune