भारती विद्यापीठ परिसरात सहा किलो गांजा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

पुणे - गांजा विकण्यासाठी आलेल्या गोव्यातील दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडे 1 लाख 3 हजार 500 रुपये किमतीचा 6 किलो 900 ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी असे आदेश दिले आहेत. 

ऍशोरय जेझस फारिया (21, रा. पाद्रीबाह, गोवा), जॉनी मिनीनो कुलासो (26, रा. हारेबन, गोवा साउथ) अशी त्या दोघांची नावे आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गंधर्व लॉन्स मंगल कार्यालयाच्या अलीकडे लाटमे यांच्या वॉशिंग सेंटरजवळील रस्त्यावर हे दोघे आपल्या आणखी दोन सहकाऱ्यांसोबत गांजा विक्री करताना आढळले. त्यानुसार त्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी कार्टन वाझ व नायझल हे दोघे जण फरार झाले. 

पोलिसांनी या दोघांसह 12 लाख किमतीची इनोव्हा गाडी जप्त केली आहे. या दोघांकडून एकूण 1 लाख 3 हजार 500 रुपये किमतीच्या गांजासह एकूण 13 लाख 9 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अनंत चौधरी यांनी केली होती. कोर्टाने ती मान्य केली. 

Web Title: marathi news crime pune