दौंडमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 16 जानेवारी 2018

दौंड (पुणे) : दौंडमधील नगर मोरी व बोरावके नगर या दोन ठिकाणी आज (मंगळवार) दुपारी झालेल्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलिस दलात (एसआरपीएफ) कार्यरत असलेल्या व्यक्तीने हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पैशांच्या वादातून हा प्रकार झाल्याचे समजते. या गोळीबारात गोपाल शिंदे (रा. वडार गल्ली, दौंड), प्रशांत पवार (रा. वडार गल्ली, दौंड), अनिल विलास जाधव (रा. बोरावकेनगर, दौंड) या तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Marathi news daund news firing 3 dies

टॅग्स