दौंड - रेल्वे पेन्शनर्सकडून २५ विधवा महिलांचा सत्कार

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 10 मार्च 2018

दौंड : दौंड रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला आहे. 

दौंड : दौंड रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला आहे. 

शहरातील सेंट्रल रेल्वे ज्युनिअर इंस्टिटयूट येथे आज (ता. १०) असोसिएशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा या वेळी गौरव करण्यात आला. अॅड. सिकंदर शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रेल्वेतून सेवानिवृत्त झालेल्या महिला कामगार आणि दिवंगत रेल्वे कामगारांच्या विधवा महिलांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वृध्दापकाळामुळे काठ्या टेकवत व एकमेकींचा आधार घेत सत्कार स्वीकारल्यानंतर या महिलांच्या चेहर्यावर एकीकडे आनंद होता तर दुसरीकडे जुन्या आठवणींनी त्यांना गहिवरून आले होते. असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल वाघाडे व एन. डी. कावळे यांनी सेवानिवृत्तीवेतन व रेल्वे पास संबंधी बदललेल्या नियमांची उपस्थितांना माहिती दिली. 

असोसिएशनच्या सदस्यांना सेवानिवृत्तीवेतन संबंधी येणार्या कायदेशीर अडचणींवर मात करण्यासाठी विना मोबदला सहकार्य करणारे अॅड. सिकंदर शेख यांनी या वेळी उपस्थितांना बॅंकेत रोकड हाताळणी घ्यावयाची काळजी संबंधी सूचना केल्या. अध्यक्ष विठ्ठल वाघाडे, माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील औटे यांच्यासह एस. एल. भालेराव, एस. आर. काळे, जगन्नाथ व्होरा, बी. वाय. धिवर, एस. डी. फाळके, आदी उपस्थित होते. एन. डी. कावळे यांनी अहवालवाचन केले. 

Web Title: Marathi news daund news widows railway