देहूत आज बीज सोहळा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

देहू - जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा शनिवारी (ता. 3) आहे. त्यासाठी लाखो भाविक देहूत दाखल झाले आहेत. 

संत तुकाराम महाराज संस्थान आणि ग्रामपंचायतीने भाविकांना सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. विविध भागांतून दिंड्या दाखल होत आहेत. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. देहूतील शेती शिवारात राहुट्या उभारून कीर्तन, प्रवचने सुरू आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठू नामाने वातावरण भक्तिमय झाले आहे. 

संत तुकाराम महाराज संस्थानने देऊळवाड्यात जय्यत तयारी केली आहे. संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त अशोक मोरे, अभिजित मोरे यांनी सांगितले. मुख्य देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिरावर रोषणाई केली आहे. परिसरात स्वच्छता केली आहे. देऊळवाड्यात सोळा आणि वैकुंठस्थान मंदिर परिसरात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शनिवारी पहाटे बीज सोहळा सुरू होईल. 

ग्रामपंचायतीने गावात व घाटावर स्वच्छता केली आहे. कीटकनाशक फवारणी केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर उपलब्ध केले आहेत. फिरते स्वच्छतागृह उपलब्ध केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे तीन ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. चार रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. जीवन प्राधिकरणाने चोवीस तास पाणी उपलब्ध करून दिले आहे. ठिकठिकाणी नळकोंडाळे बसविले आहेत. पीएमपीने गावाबाहेर बस थांबा उभारला असून, जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. चोख पोलिस बंदोबस्त आहे. महाद्वारात धातुशोधक यंत्र बसविले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांनी दिली. 

बीज सोहळा कार्यक्रम 
सकाळी 6 : वैकुंठस्थान मंदिरात महापूजा 
सकाळी 10 ते दुपारी 12 : देहूकर महाराज यांचे वैकुंठ सोहळा कीर्तन 
सकाळी 10.30 : देऊळवाड्यातून वैकुंठस्थान मंदिराकडे पालखी प्रस्थान 
दुपारी 12.30 : वैकुंठस्थान येथून पालखीचे देऊळवाड्याकडे मार्गस्थ 
रात्री 8 नंतर : पारंपरिक फड आणि दिंड्यांमध्ये कीर्तन, जागर 

Web Title: marathi news Dehu sant tukaram maharaj