स्वच्छ, सुंदर देहूसाठी ग्रामपंचायत सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

देहू - संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी देहू ग्रामपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य, स्वच्छता, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४० कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत, अशी माहिती देहूचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी दिली.

अर्जुन गुडसुरकर म्हणाले, ‘‘देहूत सुमारे दोन लाख भाविक येतात. त्यामुळे भाविकांना स्वच्छ सुंदर देहूचा अनुभव यावा म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. गावात स्वच्छतेसाठी ४० कर्मचारी नेमलेले आहेत. इंद्रायणी नदीच्या घाटावर कोणीही शौचास बसू नये, म्हणून खास पथके तैनात करण्यात आलेली आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी भाविकांना सांगण्यात येत आहे. जागोजागी कचरा गोळा करण्यासाठी टॅक्‍टर आणि घंटागाडी उभी करण्यात येणार आहे. मुख्य देऊळवाडा परिसर, वैकुंठस्थान परिसर, माळवाडी, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. गावातील गटारे स्वच्छ करण्यात आली आहेत. हॉटेल व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. अंतर्गत रस्त्यावर स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक नळकोंडाळे बसविण्यात येणार आहेत. विविध खात्यांतील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पथदिवे बसविण्यात आले असून, नदी घाटावर खास सोय करण्यात आलेली आहे.’’

Web Title: marathi news Dehu sant tukaram maharj