दोन महिन्यांमध्ये 24 जणांना डेंगी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - गेल्या दोन महिन्यांत शहरातील डेंगी आणि चिकूनगुनियाच्या संशयित रुग्णांची संख्या 115 पर्यंत पोचली आहे. सर्वाधिक डेंगीचे 104, तर चिकूनगुनियाचे 11 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 24 जणांना डेंगीची लागण झाली असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच हिपॅटायटिसचे 28 रुग्ण आढळले आहेत. 

महापालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारीत 79, तर फेब्रुवारीत 25 डेंगीचे संशयित रुग्ण आढळले. चिकूनगुनियाचे जानेवारीमध्ये 6, तर फेब्रुवारीमध्ये पाच संशयित रुग्ण आढळले. यातील 24 जणांना डेंगीची लागण झाली आहे. 

तापाचे 4 रुग्ण, इन्फ्लूएन्झाचे 3, लेप्टोस्पायरेसिसचा 1, न्यूमोनियाचा 1, तर यकृतदाह(हिपॅटायटिस)चे 28 रुग्ण सापडले आहेत. तसेच श्‍वसनाच्या त्रासामुळे आजारी व इन्फ्लुएन्झामुळे अशक्तपणा आलेले 61 रुग्ण सापडले आहेत. अनिश्‍चित कारणामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या 89 वर पोचली आहे. ही संख्या वाढू नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

निष्काळजीपणामुळे धोका 
सांडपाणी वाहिन्या, जलवाहिन्यांच्या गळतीमुळे रस्त्यात पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव होतो. निष्काळजीपणामुळे डेंगीच्या संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

Web Title: marathi news dengue health