डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याला सात दिवसांची पोलिस कोठडी 

शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे : गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात अपयशी ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 'कुलकर्णी यांचा गुन्हा खूनापेक्षाही गंभीर आहे. ग्राहकांना घर मिळाले नाही आणि पैसेही मिळाले नाहीत', असा युक्तीवाद सरकारी वकिलांतर्फे करण्यात आला. 

कुलकर्णी दाम्पत्याला आज सकाळी दिल्लीत अटक झाली होती. त्यांना सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे कुलकर्णी दाम्पत्याने न्यायालयास सांगितले. 

'रिझर्व्ह बॅंकेची परवानगी न घेता कुलकर्णी यांनी ठेवी स्वीकारल्या आहेत. ही एक हजार कोटी रुपयांची फसवणूक आहे. ग्राहकांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक झाली आहे. प्रकल्पही पूर्ण केले नाहीत. या गैरव्यवहारात इतर कोणाचा सहभाग आहे का, त्यात बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांचा आणि लेखा परीक्षण करणाऱ्यांचाही हात आहे का आणि पैशांची विल्हेवाट कशी लावली, याचा तपास करायचा आहे. या गुन्ह्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांना फसविले गेले आहे. यासंदर्भातील कागदपत्रे तपासायची असल्याने कुलकर्णी दाम्पत्याला पोलिस कोठडी सुनावण्यात यावी' अशी मागणी सरकारी पक्षाने केली. 

यावर 'कुलकर्णी दाम्पत्याने आपले पासपोर्ट पोलिसांकडे जमा केले आहेत. आरोपी सहकार्याला तयार आहेत. त्यामुळे कमी दिवस पोलिस कोठडी द्यावी' अशी विनंती कुलकर्णी यांच्यातर्फे वकील श्रीकांत शिवदे यांनी केली.  

Web Title: marathi news DSK scam DS Kulkarni Pune Crime news