एम्प्रेस गार्डनसाठी शालेय विद्यार्थीही सरसावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

मुंढवा - शहराचा ऐतिहासिक आणि पर्यावरणीय ठेवा असणाऱ्या एम्प्रेस गार्डनचे जतन करण्यासाठी लायन्स क्‍लबतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

मुंढवा - शहराचा ऐतिहासिक आणि पर्यावरणीय ठेवा असणाऱ्या एम्प्रेस गार्डनचे जतन करण्यासाठी लायन्स क्‍लबतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

एम्प्रेस गार्डनमधील साडेदहा एकर जागेवर सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, या मागणीसाठी द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्‍लब यांच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात क्‍लबचे उपप्रांतपाल रमेश शहा, ॲड. अमृत गुंदेचा, प्रवीण खुळे, अनिल मंद्रुपकर, हेमंत नाईक, डॉ. प्रसाद खंडागळे, रघुनाथ ढोले आदींनी सहभाग घेतला.  प्रतिभा पवार विद्या मंदिर येथील विद्यार्थी आणि शिक्षकदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. उद्यानाच्या जागेवर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, या मागणीचे निवदेन क्‍लबतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे ढोले यांनी सांगितले.

एम्प्रेस गार्डन शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. जुनी आणि दुर्मिळ वृक्षराजी असणाऱ्या या उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण झाल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. पर्यावरणाचा हा समतोल बिघडवू नये, किंबहुना तो अधिक संतुलित राहावा, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.
- रमेश शहा, उपप्रांतपाल

एम्प्रेस गार्डन आणि त्यापासून दहा किलोमीटरच्या परिसरातील मोकळ्या जागांचे मॅपिंग करण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी या मोकळ्या जागांचा विचार व्हावा, असा प्रस्ताव सरकारला देणार आहे.
- डॉ. प्रसाद खंडागळे

Web Title: marathi news Empress Garden student pune