'शेतकऱ्यांना बोन्साय कलेतून उत्पन्नाचा पर्याय'

'शेतकऱ्यांना बोन्साय कलेतून उत्पन्नाचा पर्याय'

पुणे - भारतातून लुप्त झालेली बोन्साय कला ही देशात पुन्हा रुजली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना पुन्हा बोन्साय कलेतून उत्पन्नाचा पर्याय मिळू शकेल, असे मत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री  व्ही. के. सिंह यांनी रविवारी व्यक्त केले. 

सिंचननगर कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित "बोन्साय नमस्ते' पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी अर्थ, वन व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महापौर मुक्ता टिळक, स्वामी गोविंद देवगिरी, डॉ. इमाम उमर अहमद इलियासी, तेलंगणा राज्याचे पशुपालन व दुग्धमंत्री तलासिनी यादव, उद्योजक जी. एस. काळे व प्राजक्ता काळे आदी उपस्थित होते. 
या वेळी सिंह म्हणाले,""आशिया खंडातील अन्य देशांमध्ये ही कला विकसित झाली. भारतातदेखील ही कला जोपासणे व विकसित करून नवा उत्पन्नाचा स्रोत म्हणून पुढे येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून बोन्साय यशस्वी होईल.'' 

वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ""भारताची ओळख गुणवंतांची भूमी म्हणून केला जातो. वामनवृक्ष कला (बोन्साय) ही भारतीय पुरातन कला आहे. कौशल्य विकास विभागाच्या वतीने बोन्साय कलेच्या विकासासाठी राज्य सरकार लागेल ती मदत करेल.'' 

महापौर टिळक म्हणाल्या, ""पुणे शहरामध्ये देश-विदेशांतून आलेल्या "बोन्साय' कलाप्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन पाहता आले. पुणेकरांना बोन्साय कलेची माहिती, महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरच स्वतंत्र बोन्साय उद्यान उभारण्यात येईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com