टोल कर्मचाऱ्यांचा पोलिस पथकावरच हल्ला

tollplaza
tollplaza

पिंपरी : टोल आणि वाद हे एक समीकरणच आहे. मात्र, टोलनाक्यावर प्रत्यक्ष पोलिस पथकालाच टोलसाठी अडविल्याची दुर्मिळ घटना काल (ता. 19) भरदिवसा उत्तर पुणे जिल्ह्यात पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी (ता. जु्न्नर) येथे घडली. एवढेच नाही, तर यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी या पोलिस पथकावर हल्ला केला. त्यात दोन पोलिस किरकोळ जखमी झाले. लाचलुचपत प्रतिबंधबक विभागाच्या (एसीबी) पुणे युनीटवर ही आफत ओढवली. त्यांचे पथक हे आळेफाटा येथे एक ट्रॅप करण्यासाठी चालले होते. मात्र, मध्येच हे विघ्न आले. त्यामुळे त्यांची ट्रॅपची कारवा झालीच नाही. याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यावर चाळकवाड़ी टोल नाक्यावरील अधिकारी संजय लोणे, कर्मचारी प्रदीप देशमुख, पांडुरंग रणदिवे आणि आनंद यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, अश्लील शिविगाळ करणे, दमदाटी करणे, मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात एसीबीच्या पुणे युनीटचे उपअधिक्षक जगदीश सातव म्हणाले, उपअधिक्षक कांचन जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी व पथक हे ट्रॅपसाठी पु्ण्याहून आळेफाटा येथे चालले होते. नेहमीप्रमाणे हे पथक साध्या वेषात होते. तसेच त्यांच्याकडील मोटारही खासगी होती. त्यामुळे चाळकवाडी टोलनाक्यावर ती अडविण्यात आली. त्यावर पोलिसांनी आपली ओळख दाखविली. तेव्हा पोलिस ओळखपत्र येथे चालत नाही, असे या पोलिस पथकाला सांगण्यात आले. मात्र, सरकारी कामासाठी चालते, असे या पथकाने सांगितले. त्यावर वरील तीन टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली. हे पाहून टोलनाक्याचे अधिकारी लोणे तेथे आले. टोल कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित बोलावे, असे जाधव हे लोणे यांना म्हणाले. त्यावर त्यांच्यासमक्ष तीन टोल कर्मचाऱ्यांनी या महिला पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीत दोन पोलिस जखमी झाले. त्यानंतरही या पोलिस पथकाची मोटार सोडण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची लाचखोरीच्या ट्रॅपसाठी (सापळा) जाताच आले नाही. परिणामी ही कारवाई होऊच शकली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com