कहाणी कर्वेनगरच्या उड्डाणपुलाची

राजेंद्रकृष्ण कापसे / विनायक बेदरकर
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

वारजे माळवाडी /कोथरुड - कर्वेनगर व वारजे जुना जकात नाका येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वनदेवी ते वारजे येथील चौधरी शाळेपर्यंत उड्डाणपूल हवा अशी भूमिका आमची होती. त्यास तत्कालिन शिवसेनेचे उपमहापौर चंद्रकांत मोकाटे यांनी प्रतिसाद दिल्याने "सकाळ'च्या "प्रतिबिंब'मध्ये मांडली होती. पुलाची पुढील प्रक्रिया मार्गी लागली. आणि आज अखेर त्या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील एका पुलाचे उद्‌घाटन आज शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. 

वारजे माळवाडी /कोथरुड - कर्वेनगर व वारजे जुना जकात नाका येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वनदेवी ते वारजे येथील चौधरी शाळेपर्यंत उड्डाणपूल हवा अशी भूमिका आमची होती. त्यास तत्कालिन शिवसेनेचे उपमहापौर चंद्रकांत मोकाटे यांनी प्रतिसाद दिल्याने "सकाळ'च्या "प्रतिबिंब'मध्ये मांडली होती. पुलाची पुढील प्रक्रिया मार्गी लागली. आणि आज अखेर त्या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील एका पुलाचे उद्‌घाटन आज शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. 

कर्वेनगर येथील कर्वे स्त्री शिक्षण संस्था, स्थानिक नागरिकांची रहदारी, चौकातील बसथांबा, या चौकात पुर्वी असणारा मजुर अड्डा, अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी, सिग्नलला गर्दी होत असे. नागरिकांना चौक ओलांडताना त्यांना जीव मुठीत घ्यावा लागत असे. त्यानंतर या चौकात भूयारी मार्ग देखील झाला. परंतू, त्याचा वापर कमी होत होता. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमुळे चौकात रस्ता ओलांडणाऱ्या मुलींची संख्या जास्त होत आहे. त्याचबरोबर, वारजे जुना जकात नाका चौकात सात दिशेने रस्ते येथे एकत्र येतात. परिणामी चौकाची स्थिती गंभीर होती आणि आहे. या दोन्ही चौकात वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांचे आणि वारजे कोथरुडहून येणाऱ्या जाणारे वाहन चालक व प्रवाशी अडकले जात होते. म्हणून वनदेवी मंदिर ते चौधरी शाळा असा उड्डाणपूल असावा. ही भूमिका मांडली होती. सुरवातीला सर्वेक्षण देखील असे झाले होते. परंतू त्यांनतर महापालिकेने एका पुलाचे दोन उड्डाणपूल झाले. त्यातील पहिल्या पुलाचे भूमिपुजन 10 फेब्रुवारी 2013 रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. विविध अडथळ्यांची शर्यंत पुर्ण करुन पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन त्याचे आज शनिवारी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. या पुलाच्या कामासाठी सुमारे 22 कोटी 64 लाख रुपयांची तरतूद केली होती. हे काम या कंपनीला 22 ऑक्‍टोबर 2012 रोजी सिम्प्लेक्‍स इन्फ्राला दिले होते. विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदी आखणी, वाहतूक पोलिस परवानगी यामुळे, प्रत्यक्ष काम सुरु होण्यास 14 जून 2013 हा दिवस उजाडला. या कामाची मुदत 30 महिने(अडीच वर्षाची) होती. भूसंपादन, वीज वाहिन्या, जलवाहिन्या, हलविणे ही कामे निविदेतील अटी शर्थीप्रमाणे कामाची गती ठेकेदाराला राखता आली नाही. त्यामुळे, काम पूर्ण होऊ शकले नाही. 

31 जानेवारी 2018 ही अखेर मुदत वाढ देण्यात आली होती. जागेवरील अडचणीमुळे ही मुदतवाढ दिली होती. 15 जून 2015 पासून दररोज सहा हजार रुपये तर एक जून 2017 पासून दंड रक्कम दररोज 10हजार करण्यात आली होती. त्यानुसार सुमारे 70 लाख रुपयांचा दंड ठेकेदारास करण्यात आला आहे. दरम्यान, मुदतवाढीच्या कालावधीत भाववाढीचे सुत्र यावेळी थांबविले. त्या काळातील कामासाठी भाववाढी सुत्रानुसार अतिरिक्त रक्क ठेकेदाराला दिली जाणार नाही.

Web Title: marathi news Flyover Karvengar pune warje malwadi kothrud