मुलींचा जन्मदर ३९ टक्‍क्‍यांनी घटला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

कामशेत - मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, यासाठी सरकारने ‘लेक वाचवा’ मोहीम सुरू केली. त्यानंतर काही प्रमाणात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांत सोनोग्राफी सेंटरवरील भरारी पथकाची कारवाई थंडावल्याने काही ठिकाणी पुन्हा चोरून तपासणी सुरू आहे. त्यामुळे मावळात मुलींच्या जन्मदरात गेल्या तीन वर्षांत ३९ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

मुलींच्या जन्मदरात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने दोन वर्षांपासून अनेक महिलांनी तक्रार करून आवाज उठविला होता. परंतु, भरारी तपास पथकातील एक डॉक्‍टरच सामील असल्याने आजपर्यंत कारवाई होऊ शकली नाही. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे म्हणाले, ‘‘तालुक्‍यात सोनोग्राफीचा दुरुपयोग झाल्याने २०११ ते १२ या वर्षात हजारी ८५१ इतका मुलींचा जन्मदर घटला. त्या नंतर जनजागृतीमुळे कारवाई केल्याने सोनोग्राफीचा दुरुपयोग होण्याच्या प्रमाणात काहीशी घट झाली. परंतु, अद्यापही काही ठिकाणी हा प्रकार सुरू आहे, असे समजते. या बाबत महिलांनी माहिती दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल.’’

तालुक्‍यात २४ सोनोग्राफी सेंटर आहेत. त्यातील पाच बंद आहेत. एकाचा न्यायालयात दावा सुरू आहे. या महिन्यात आम्ही सर्वत्र तपासणी केली असून, एका ठिकाणी त्रूट आढळली. तो अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. तालुक्‍यात जर कोणीही डॉक्‍टर बेकायदेशीर तपासणी करत असेल तर ती माहिती कळवावे. सरकारने २५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. मात्र, ती रक्कम न्यायालयाचा निकाल झाल्यानंतर ती मिळते.
डॉ. अमोल गडकर, वैद्यकीय अधीक्षक, भरारी पथक
 
Web Title: marathi news Girls birth rate decreased by 39 percent kamshet