परराज्यांतून मागणी;द्राक्षांना चांगला भाव

परराज्यांतून मागणी;द्राक्षांना चांगला भाव

पुणे - पुणे, नाशिक, सांगली जिल्ह्यातील चांगल्या प्रतीच्या द्राक्षांना कोलकता, दिल्ली, गोवा, जयपूर, गुजरात, कर्नाटक या राज्यांतून मागणी वाढू लागली आहे. तेथील बाजारांत या द्राक्षांना चांगला भाव मिळत असून, हलक्‍या प्रतीच्या आणि कमी भाव असलेल्या द्राक्षांना तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मागणी आहे.

परराज्यांतून वाढलेल्या मागणीमुळे द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे. द्राक्षाला गोडी; तसेच हिरवा रंग येण्यापूर्वीच उत्पादक तोडणी करू लागले आहेत. त्यामुळे बाजारात काही प्रमाणात चवीला आंबट आणि फिकट हिरव्या रंगाच्या द्राक्षांची आवक होत आहे. वातावरणातील बदलाचा द्राक्षांच्या गोडीसह चवीवर परिणाम होत आहे. आवक वाढल्याने भाव कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

याबाबत व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, ‘‘डिसेंबरपासून द्राक्षांचा हंगाम सुरू झाला असून, तो मार्चपर्यंत राहील. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर; तसेच फलटण, सोलापूर, नाशिक आणि सांगली जिल्ह्यातून पुण्याच्या बाजारात द्राक्षांची आवक होते. सध्या २५ ते ३० टन आवक होत असल्याने एका कॅरेटमागे २०० ते २५० रुपयांची घट झाली आहे.’’

चांगल्या प्रतीच्या द्राक्षांना दिल्ली, गोवा, कोलकता, जयपूर, गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, बडोदा आणि कर्नाटकातील बाजारपेठेतून मागणी वाढली आहे. काळ्या रंगाच्या ‘जंबो’, ‘शरद सिडलेस’, ‘कृष्णा शरद’ या जातींच्या द्राक्षांना या भागातून अधिक मागणी आहे. हलक्‍या प्रतीच्या द्राक्षे, तपकिरी, काळा रंग पडलेली द्राक्षांना तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेशातून मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com