हडपसर : दिशादर्शक कमान कोसळली

trolly accident
trolly accident

हडपसर : हायड्रोलिक डंपरची ट्रॅाली उघडी राहिल्याने महापालिकेच्या दिशादर्शक लोंखडी कमानीला ती अडकली. परिणामी पुणे शहराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील कमान खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सुमारे तीन तास पुण्याकडे जाणारी व मगरपट्टा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. तीन तासाच्या प्रयत्नानंतर कमानीत अडकलेला डंपर व कमान बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ही घटना गुरवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर भोरी पडळ येथे घडली.

सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालकाच्या हयगयीमुळे डंपरची हायड्रोलिक ट्रॅाली उघडली राहिली होती, त्यामुळे मगरपट्टा पूल उतरल्यानंतर भोरे पडळ येथे असलेल्या कमानीत ती अडकली. कमान लोंखडी व मोठया वजनाची असल्याने ती खाली कोसळली. डंपरने सुमारे २०० फूट लांब कमानीला ओढत नेले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. घटनेनंतर घाबरलेला चालक डंपर तेथेच सोडून पळून गेला. अपघातानंतर वाहतूक कोंडीमधून वाट काढीत पोलिस घटना स्थळी पोहचले व क्रेनच्या साहयाने लोखंडी कमान व डंपरला बाजूला केले. हा अपघात झाला
त्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या घाबरलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेत दोन विदयुत खांब व एका झाडाचे नुकसान झाले तसेच वायरिंग तुटल्या. आग्नीशामक दलाची गाडी गर्दीतून वाट काढत उशीरा पोहचली. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कमान बाजूला केली. सुदाम झगडे, गणेश पवळ, दिपक चौरे, बापू अडागळे या आग्नीशामक केंद्राच्या कर्मचा-यांनी मेहनीतीने कमान बाजूला केल्याने तीन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी व क्रेनच्या सहाय्याने कमान बाजूला काढण्यासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण लोंढे, पोलिस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर म्हेत्रे, पी. पी. गायकवाड, युवराज कांबळे, वैभव भोसले, बच्चूसिंग टाक, सुनिल बोरकर, सचिन लांडगे यांनी आपली जबाबदारी चोख
बजावली. दरम्यान हयगयीने वाहन चालवून महापालिकेच्या कमानीचे नुकसान करणे
व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि वाहन हायगयीने चालविल्याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

या घटनेमुळे गाडीतळ ते भोरीपडळ व मगरपट्टा चौक ते साउथ मेन गेट या मार्गावर तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान एक ट्रक भऱ रस्त्यात बंद पडल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. सुरवातील अनेक वाहन चालक कोसळलेल्या दिशादर्शक कमानी खालून धोकादायकरित्या वाहने नेत होते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कमानीखालून जाणारी वाहतूक बंद केली. बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावावे लागवे. कमान खाली कोसळत असतानाच काही वाहन चालकांनी प्रसंगी अवधान राखून वाहने वेगाने पुढे नेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com