भेकराईनगर येथे एसटी व पीएमपी बसवर दगडफेक

संदिप जगदाळे
मंगळवार, 2 जानेवारी 2018

हडपसर : पुणे-सासवड रस्त्यावर अज्ञात तरूणांकडून भेकराईनगर येथे एका एसटी व पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. भेकराईनगर येथील पोलिस चौकीसमोरच ही घटना घडली. तातडीने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. दोन्ही वाहने भेकराईनगर येथील जकात नाक्यावर हलविण्यात आली. भिमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही दगडफेक झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

पोलिस निरिक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी स्वारगेटहून बारामती तर बस कात्रज उंड्रीमार्गे हडपसरच्या दिशेने जात होती. यावेळी तोंडाला रूमाल बांधलेल्या व हातात निळे झेंडे घेतलेल्या तरूणांनी दोन्ही वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर ते पसार झाले. संबंधित तरूण ज्या दिशेने गेले, त्या दिशेने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Web Title: Marathi news hadapsar news attack on bus and st