ज्येष्ठ नागरिकाला तरूणांनी दिला मदतीचा हात

संदिप जगदाळे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

हडपसर : ऐंशी वर्षांच्या वृध्दाच्या पत्नीचे निधन झाले. मुंबईला दोन मुले राहतात. त्यातील एकाची खोली लहान आहे. तर दुसरा सधन. या दोघांनी वडिलांना सांभाळण्यास नकार दिला. अखेर पुण्यात राहणा-या मोलमजूरी करणा-या मुलाने वडिलांना पुण्यात आणले. स्वतःचे घर नाही, जागा मिळेत तिथे हा मुलगा झोपतो. त्यामुळे वडिलांना वृध्दाश्रमात ठेवण्याचा निर्णय या मुलाने घेतला. तो अनेक वृध्दाश्रम फिरला. मात्र वय जास्त, फिजीकल फिटनेस नसल्याने तर कोठे वेटींग लिस्ट असल्याने तर काही ठिकाणी महिन्याला मोठी रक्कम मोजावी लागणार असल्याने वडिलांना वृध्दाश्रमात प्रवेश नाकारला. 

अखेर वानवडी येथील ध्येय फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार समजला. तीन मुले असताना सुद्धा बाबांना निवारा मिळत नाही ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना पाहून कार्यकर्ते हवालदिल झाले. त्यांनीही वृध्द काकांना आश्रमात ठेवण्यासाठी अनेक आश्रमाच्या पाय-या झिजविल्या. मात्र मुलाला आलेला अनुभव त्यांनाही आला. 

श्रीपती शंभू गुठाळ असे बाबांचे नाव. अखेर कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून बाबांच्या गावाकडेच त्यांचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतला. करमाळा चिखलठाण हे बाबांच गाव. बाबांच्या शेजारी राहणा-या एका काकूंकडे बाबांची खानावळ लावली आहे. त्याच बाबांची देखभाल करणार आहेत. दरमहा हा खर्च कार्यकर्तेच करणार आहेत. तसेच बाबांची कपडे धुण्यासाठी एका लाँड्रीच्या दुकानदारावर जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे बाबांच्या राहण्याच्या व खाण्याचा प्रश्न सुटला. त्यानंतर बाबांच्या डोळ्यात आश्रू आले. ते म्हणाले मला गावाला करमून जाईल. माझी जन्मभूमी आहे ती. 

ध्येय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन होले म्हणाले, बाबांना पुण्यात आणल्यावर आम्ही लॅाजवर ठेवले होते. आम्ही गेलेल्या आश्रमामध्ये वेटिंग आहे. त्यामुळे जास्त दिवस बाबांना लॅाजवर ठेवणे योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही बाबांना गावीच ठेवण्याचा निर्णय घेतला. काही आश्रमांच्या आम्ही संपर्कात असून तेथे सोय झाली तर आम्ही पून्हा बाबांना आश्रमात ठेवणार आहोत. मात्र कोठे रहायचे हा निर्णय सर्वस्वी बाबांचा असणार आहे. प्रतिष्ठानचे शुभम होले, रविंद्र येळे, अमोल कुदळे, मयुर कुदळे, तात्या पवार, प्रतिक तोडकर, सायली धनाबाई, उमेश कुदळे, अमोल कुदळे यांनी बाबांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले. 

बाबा म्हणाले, उजनी धरणात माझी शेती गेली. गावी छोटस घर आहे. पोटच्या मुलांना हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. पत्नी गेली. मी पोरका झालो. या तरूण मुलांच्या रूपाने मला देव भेटला. मी या मुलांचे ऋण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. पोटच्या पोरांपेक्षा ही मुले माझ्यासाठी मोठी आहेत. देव या सर्वांचे कल्याण करो. 
 
Web Title: Marathi news hadapsar news youth helps senior citizen