तळेगावात सफाई कामगार महिलांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

तळेगाव दाभाडे - महिला दिनानिमित्त तळेगाव नगर परिषदेच्या वतीने कार्यालयीन महिला कर्मचारी, शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. त्यांच्या हस्ते कर्मचारी महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती संध्या भेगडे यांनी शहर स्वच्छता  मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल महिलांना धन्यवाद दिले. भाजपच्या शहराध्यक्षा शोभा भेगडे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांनी मनोगत व्यक्त केले.

नगरसेविका मंगल जाधव, प्राची हेंद्रे, कल्पना गटे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे उपस्थित होत्या. सुलोचना भोंगाडे  यांनी सर्वांच्या वतीने सत्काराबद्दल नगर परिषदेला धन्यवाद दिले. रसिका लामखेडे यांनी सूत्रसंचालन केले. अनिता पवार यांनी  आभार मानले. 

घरकामगार महिलांचा सत्कार
विरांगणा बचत गटाच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. येथील दादा-दादी सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात विरांगणा जिजाबाई, सावित्रीबाई फुले व सरसेनापती उमाबाई दाभाडे आदींच्या कार्याची संक्षिप्त माहिती अमृता भंडारी यांनी दिली. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, विभावरी दाभाडे यांनी शुभेच्छा दिल्या. नीलिमा दाभाडे, संध्या भेगडे, सारिका भेगडे, सारिका शेळके, स्वाती भेगडे, ज्योती जाधव, शोभा भेगडे, विना दाभाडे, आरती दाभाडे, शारदा शेटे, स्मिता आर्लेकर आदी उपस्थित होत्या.

महिलांना स्वत-च्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने ११ बचत गटांची स्थापना केल्याची माहिती नीलिमा दाभाडे यांनी दिली. चारुशीला काटे यांनी सूत्रसंचालन केले. रजनी ठाकूर यांनी आभार मानले.

महिलांनी घेतले कायदेविषयक ज्ञान
कामशेत - जागतिक महिला दिनानिमित्त कामशेत येथे महिलांनी कायदेविषयक चर्चासत्र घेतले. तसेच विविध स्पर्धा घेऊन महिला दिन उत्साहात साजरा केला. या वेळी सरपंच सारिका घोलप, माजी सरपंच सारिका शिंदे, ॲड. रोहिणी मुथा, रूपाली शिनगारे, मीना गायकवाड, मंगला जाधव, मायाताई येवले, वनिता वाघवले यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. मुथा म्हणाल्या, ‘‘महिलांसाठी अनेक कायदे आहेत. या कायद्यांचा अभ्यास करावा.’’ ‘माझी कन्या भागश्री’ या शासकीय योजनेची माहिती मीना गायकवाड यांनी दिली. तर ‘आरोग्य व बेटी बचाव बेटी पढाओ’ याची माहीती मंगला जाधव यांनी दिली. उच्चपदावर ज्या महिलांनी आपला ठसा उमटवला अशा महिलांची नावे काय, त्या कोणत्या हुद्यावर काम करतात, असे प्रश्‍न उपस्थित महिलांना विचारण्यात आले. या स्पर्धेत यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच कामशेत पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

मोफत ताक वाटप
वाल्हेकरवाडी - जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी वाल्हेकरवाडीतील पंजाबी डेअरी यांच्याकडून मोफत ताक वाटप करण्यात आले. ‘‘विविध सामाजिक कार्यात आम्ही भाग घेत असतो. महिला दिन व उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने परिसरातील महिलांना घरोघरी जाऊन ताक वाटप केले. हा उपक्रम शनिवारपर्यंत (ता. १०) राबविणार आहोत,’’ असे कमलजित सिंग यांनी सांगितले. या साठी जी. एस. मेहता, तनप्रीत मेहता, हरदीप मेहता, कौशल ठाकूर, नितीन श्रीवास्तव, डी. बी. मांगले परिश्रम घेत आहेत.

Web Title: marathi news International Women Day women talegaon dabhade