शिक्षिकांकडून सफाई कामगारांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

केशवनगर - सकाळी लवकर उठून घरातली सर्व  कामे मार्गी लावल्यानंतर, परिसरातील सगळा कचरा साफ करायचा.... रोजच नाका-तोंडाचा धुळीशी मुकाबला करायचा... हा सफाई महिला कामगारांचा रोजचाच नित्यक्रम... यात काही यत्किचिंतही बदल तर नाहीच. पण दररोजच झाडू असणाऱ्या हातात आज एक सन्मानाच्या आपुलकीची भेट होती.... बसायला व्यासपीठावर खुर्ची विराजमान होती.... गाड्यांचे कर्कश हॉर्न ऐकणारे कान आज टाळ्यांचा कडकडाट ऐकत होते ते ही स्वतःच्या सत्काराचे. निमित्त होते महिलादिनानिमित्त सारथी विद्यालयाच्या महिला शिक्षिकांनी महिला कामगारांच्या सत्काराचे.

राघोबा पाटीलनगर येथील सारथी विद्यालयात महिलादिनानिमित्त सारथी विद्यालयातील महिला शिक्षिकांनी येथील सफाई महिला कामगारांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सफाई महिला कामगारांना साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मधुरा चौधरी, शुभांगी माने, जयश्री काळे, पूनम जगताप, ज्योती साळवे, शारदा भुजबळ, सुनीता जाधव,  सुनीता त्रिभुवन, मनीषा शिर्के, कविता केदार, सुनीता कुंभार, उर्मिला ढवळे, वैशाली गव्हाणे, प्रणयनी सोनवणे, शकुंतला कुंजीर, अनिता कावरे, संगीता जाधव, स्वाती लिंगायत, अपर्णा वसव उपस्थित होते. सारथी संस्थेचे सचिव प्रकाश साळुंके यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले. 

कामगार महिला भारावल्या.....
या सन्मानाने भारावलेल्या सोनाली शिंदे म्हणाल्या, ‘‘लय वरीस झालं रस्ते झाडतोया अन कचरा गोळा करतोया पन असा घरच्यागत सन्मान मात्र कोणी नाय दिला, आज असं वाटतया आमी बी शाळा शिकलो असतो तर या बाईंगत मोठं माणूस झालो असतो. तुमचं लय उपकार झालं बाई. पोरांनो आज तुमाला शिकायला मिळतंय लय शिका अन्‌ मोठं व्हा, पन आपली साळा अन्‌ आपला परिसर मात्र स्वच्छ ठेवा म्हंजी झालं.’’

Web Title: marathi news international women pune