जुन्नर येथे घर आगीत भस्मसात

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

आळु-पिंपळगाव जोगा (ता.जुन्नर) : येथे आज शुक्रवार (ता.22) रोजी पहाटे राहत्या तीन घरांना अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी वस्तुसह कागदपत्रे भस्मसात झाली आहेत. घाटघरचे तलाठी नामदेव लूमाजी तळपे यांना आगीचे नेमके कारण सांगता येत नाही पण यामागे घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांची पत्नी जिजाबाई यांना पहाटे जाग आल्याने घरातील दहा जीव वाचले असल्याचे सांगण्यात आले.

ही घटना पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीतील आळु येथे शुक्रवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली. घाटघरचे तलाठी नामदेव लुमाजी तळपे यांचे तसेच त्यांचे बंधु हनुमंत लुमाजी तळपे आणि पुतणे संपत धोंडिभाऊ तळपे या तिघांची कुडीची व पत्र्याची राहती भस्मसात झाली आहे. याबाबत मंडलधीकारी एस. बी. बेनके व डी. पी. माळी व तलाठी सुरेंद्र जाधव यानी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. त्यात या तीन ही कुंटुंबाचे भात इंद्रायणी तांदुळ 1500 किलो, तांदुळ 200 किलो, भुईमुग शेंगा 8 पोती, गहु 200 किलो, बाजरी 200 किलो, सोयाबीन 100 किलो, घरातील संसार उपयोगी वस्तु एक लाख रुपये, फ्रीज, इलेट्रीक मोटार व इतर वस्तू, सागवानी लाकुड, रोख रक्कम असे एकुण तीन लाख तीस हजार रुपये किंमतीच्या चीज वस्तु आगीत भस्मसात झाल्या असून सर्व कुंटुंबातील सदस्यांचे रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले, जात वैद्यता प्रमाण पत्र, मुलांचे शालेय प्रमाण पत्र व मार्कलिस्ट, बँक पासबुक, घरातील चार मोबाईल, रासायनिक खते, कोबड्या यांचे या आगीत जळले आहे.

या आगीबाबत ओतुर पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे. सदर तीन घराना आग लागली हे कळताच जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले व शशी सोनवणे यानी घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: Marathi news junnar fire at home