पुणे - जुन्नरमध्ये पुन्हा आढळले बिबट्याचे दोन बछडे

दत्ता म्हसकर
शनिवार, 10 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : राजुरी ता. जुन्नर येथे गुरव शेतमळा परिसरातील एका शेतात ऊस तोडणी सुरु असताना, तोडणी मजुरांना सुमारे पाच ते सहा दिवसाचे बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहेत. हे बछडे मादीने सोबत न्यावेत यासाठी माणिकडोह निवारा केंद्रातील डॉ.अजय देशमुख व वनकर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे सोडले परंतु ते मादीने नेले नाहीत यामुळे आज पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

राजुरी येथे गुरवशेतमळा परिसरात बंटी हाडवळे यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी ऊस तोडणी सुरु होती. यावेळी ऊसतोडणी मजुरांना अंदाजे पाच ते सहा दिवस वयाचे बिबट्याचे दोन लहान बछडे आढळून आल्याने ऊसतोडणी थांबविण्यात आली होती. याबाबत  संबंधित शेतकऱ्याने वनविभागाला माहिती दिल्यानंतर  वनरक्षक जे. बी. सानप यांनी भेट देऊन खात्री केली होती. 

या ठिकाणी जवळपास बिबटयाची मादी असण्याची शक्यता लक्षात घेऊन, बिबट्याचे बछडे लहान असल्याने त्यांना पुन्हा आईच्या कुशीत पाठविण्याच्या दृष्टीने वनविभागाचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले. जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसतोडणीची कामे सुरु आहेत. बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, यावर तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.   

Web Title: Marathi news junnar news Calves leopard found in farm