जुन्नर येथे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

दत्ता म्हसकर
रविवार, 31 डिसेंबर 2017

जुन्नर - श्री क्षेत्र लेण्याद्री येथे 225 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, डोके हॉस्पिटल व डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोगनिदान शिबीर तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर यांनी दिली. 

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे यात्रीनिवास भाग 2 मधील सभागृहात शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डी. डी. डोके होते. शिबिरात परिसरातील 225 रुग्णांची तपासणी करण्यात आली. डोके हॉस्पिटल नारायणगाव यांचे वतीने 150 रुग्णांची हृदयरोग तपासणी, पोटाचे विकार आदी तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली. तसेच मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव यांचे वतीने 75 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील 16 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी नगरसेविका सुवर्णा बनकर, गोळेगावच्या सरपंच शारदाताई लोखंडे, देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकरराव ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, कार्यलयीन सचिव रोहिदास बिडवई तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. शंकरराव ताम्हाणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. जितेंद्र बिडवई यांनी सूत्रसंचालन केले. संजय ढेकणे यांनी आभार मानले. 

Web Title: Marathi News Junnar News Free health checkup camp