विज्ञान शिक्षकाने विद्यार्थ्यांची साधनसंपत्ती बनावे - विमला ओक 

 दत्ता म्हसकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

जुन्नर : विज्ञान शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी साधनसंपत्ती बनले पाहीजे असे मत लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री संस्थेच्या ज्येष्ठ संशोधिका विमला ओक यांनी येथे व्यक्त केले. जुन्नर तालुक्यातील विज्ञान शिक्षकांसाठी आयोजित दोन दिवसीय विज्ञान प्रशिक्षण शिबीरात मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. सोसायटी फॉर सोशल ईनोव्हेशन अॅन्ड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष प्रा. सुभाष कत्ते अध्यक्षस्थानी होते.

जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ, विद्यासंस्कार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. ओक म्हणाल्या, विज्ञान हा विषय तेव्हाच अधिक प्रभावीपणे मुलांच्या गळी उतरु शकतो जेव्हा तुम्ही शिक्षक हा विषय अगदी तल्लीन होऊन शिकवता माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अधिक रोचक पद्धतीने कसा शिकवावा, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवताना, कोणती काळजी घ्यावी, मुलांचा अधिक प्रमाणात सहभाग प्रयोगशाळेत प्रयोगात कसा वाढवावा या विषयी देखील ओक यांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, विद्यासंस्कार प्रतिष्ठानचे मोहन गाडेकर यावेळी उपस्थित होते. प्रा. सुभाष कत्ते यांनी नवी पिढी टेक्नोसॅव्ही आहे हे सांगतानाच या मुलांचे मुलभूत विज्ञान अधिक प्रगल्भ झाले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली. विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल यांनी स्वागत केले. प्रा. सुभाष कत्ते यांनी आभार मानले. शिक्षकांनी सहभाग घेतला.

Web Title: Marathi news junnar news science teachers