तंत्रशिक्षणाबाबत जागृती होण्याची गरज

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 14 जानेवारी 2018

भिगवण - एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाच्या विविध अविष्काराचे शतक आहे. तंत्रज्ञानाने शिक्षण, संरक्षण, शेती, क्रीडा आदी जीवनाशी संबधित सर्वच क्षेत्रांना तंत्रज्ञानाने व्यापले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये क्रांती आणणे शक्य आहे. शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून युवकांमध्ये तंत्रशिक्षणाविषयी जागृती व शिक्षण देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे सचिव बी. के. दहिफळे यांनी केले.

स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला अभियांत्रिकी महाविदयालयात 'शैक्षणिक तंत्रज्ञानातील क्रांती' या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्धाटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागिय सचिव बी. के. दहिफळे यांनी केले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ, दत्तकला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. ए. पाटील उपस्थित होते. श्री. दहिफळे पुढे म्हणाले, शहरी भागांमधील शैक्षणिक संस्थामध्ये आधुनिकीकरणाचे वारे वाहत आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्येही तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, तंत्रज्ञानामध्ये सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल करण्याची क्षमता आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांमध्ये आधुनिक शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांनी नोकरी व व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील तरुणांनी तंत्रशिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. या धरतीवर दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थामध्ये काम करणाऱ्या अध्यापकांना प्रशिक्षण देण्यामध्ये महत्वपुर्ण भुमिका निभावू, असे आश्वासन संस्थेच्या वतीने देण्यात आले. यावेळी प्रा. माया झोळ, प्राचार्य एस. ए. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन बेरे यांनी केले. सुत्रसंचालन अमोल राजपुरे व अमोल जाधव यांनी केले. तर आभार प्राचार्य सचिन लवटे यांनी मानले. चर्चासत्रासाठी दौंड, इंदापुर, बारामती, करमाळा (जि. सोलापुर), कर्जत (जि. अहमदनगर) आदी तालुक्यातील शैक्षणिक संस्थातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
 
Web Title: marathi news knowledge of technology must need in society