'महाराष्ट्र बंद'चा आढावा

बुधवार, 3 जानेवारी 2018

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचाराने केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्णपणे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. अफवांनी सुरुवात झालेल्या या प्रकरणाने आता मात्र रौद्र रुप धारण केले आहे. याचा सततचा पाठवुरावा विविध छायाचित्र व व्हिडीओच्या माध्यमातून 'ई सकाळ'ने घेतला आहे. हिंसाचाराच्या सलग तिसऱ्या दिवशीपर्यंत निषेधाच्या नावाखाली कुठे जाळपोळ तर कुठे तोडफोड सुरु आहे. 

पुणे येथील कोरेगाव भीमा येथून सुरु झालेला हा हिंसाचार मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण येथील सर्वच लहान मोठ्या गावांमध्ये पसरत गेला. या सगळ्यांचे सविस्तर अपडेट 'ई सकाळ' या घटनेच्या पहिल्या दिवसापासून देत आहे. व्हिडीओच्या माध्यमातून पुन्हा एकदा नजर टाकुया आज 'महाराष्ट्र बंद'च्या दिवशी दिवसभरातील कोरेगाव भीमा हिंसाचाराला निषेध करणाऱ्या घडामोडींवर.    

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रीया -

तेल्हारा (अकोला) येथील जेष्ठ नागरिक संघाने केला बंदला समर्थन.

कोल्हापूर कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात. आज सकाळपासून कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड करून बंदची हाक.

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बारामतीत विराट मोर्चा.

स्वारगेट - पुणे ते सातारा आणि पुणे ते बारामती एसटी वाहतूक बंद.

मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे विरोधात घोषणाबाजी (पुणे मनपा परिसर)

कोल्हापूर बंदच्या दरम्यान तरुण भारत कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

Web Title: Marathi News Koregaon Bhima Maharashtra Banda eSakal photos videos