आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी 'केपीआयटी स्पार्कल २०१८'चे विजेते

सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

'केपीआयटी स्पार्कल २०१८' या राष्ट्रीय पातळीवरील नावीन्यता स्पर्धेची अंतिम फेरी काल पुण्यात झाली. यामध्ये आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांच्या 'सांडपाण्यातील बॅक्टेरियापासून बॅटरी बनवण्याच्या' संशोधनाला प्रथम पारितोषिक मिळाले. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन आणि राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाचे (एनएसटीईडीबी) सदस्य सचिव श्री. हरकेश मित्तल यांच्या सन्माननीय उपस्थितीत विजेत्यांनी रोख पारितोषिके आणि पदके प्रदान करण्यात आली.

पुणे : 'केपीआयटी स्पार्कल २०१८' या राष्ट्रीय पातळीवरील नावीन्यता स्पर्धेची अंतिम फेरी काल पुण्यात झाली. यामध्ये आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांच्या 'सांडपाण्यातील बॅक्टेरियापासून बॅटरी बनवण्याच्या' संशोधनाला प्रथम पारितोषिक मिळाले. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन आणि राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाचे (एनएसटीईडीबी) सदस्य सचिव श्री. हरकेश मित्तल यांच्या सन्माननीय उपस्थितीत विजेत्यांनी रोख पारितोषिके आणि पदके प्रदान करण्यात आली.

 'केपीआयटी स्पार्कल २०१८' हा कंपनीच्या इनोव्हेशन कौन्सिलचा उपक्रम आहे. कंपनीच्या अंतर्गत कामकाजात आणि बाह्यव्यवहारांमध्ये नावीन्यतेवर भर देणाऱ्या केपीआयटी या कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर या कौन्सिलचे अध्यक्ष आहेत.

Image may contain: 3 people, people standing

या स्पर्धेसाठी उर्जा, दळवळण क्षेत्रासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, नवी साधने (मटेरिअल) आणि सायबर सिक्युरिटीची वापर करून हरित, सुरक्षित आणि वापरकर्त्यासाठी सुलभ असलेली उत्पादने विकसित करण्ये आव्हान विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले होते. या स्पर्धेच्या पात्रतापूर्व फेरीत भारतभरातील ६०० अभियांत्रिकी आणि विज्ञान महाविद्यालयांतून १२,००० हून प्रवेशिका प्राप्त झाल्या. यात आयआयटी आणि एनआयटी यासारख्या २८ प्रिमिअर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. त्यापैकी १५००+ सघांमधून नावीन्यता, वाजवी खर्च आणि व्यवहार्यतेच्या निकषांवर ३० संघांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती.

Image may contain: 5 people, people smiling, people standing and text

यावेळी केपीआयटीचे सहसंस्थापक, अध्यक्ष आणि समूह सीईओ रवी पंडित म्हणाले, "स्पार्कलच्या माध्यमातून आम्ही उदयोन्मुख संशोधकांना त्यांच्या कल्पना उत्पादनांमध्ये परीवर्तीत करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर्स उपलब्ध करून देऊ. त्याचप्रमाणे काही आश्वासक कल्पनांना विकसित करण्याचा विचार केपीआयटीतर्फेही करण्यात येईल."

स्पर्धेतील इतर विजेत्यांची नावे :

  • सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट
  • पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
  • डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हमीरपूर 

Image may contain: 4 people, people smiling, people standing

Web Title: marathi news kpit sparkle winner iit kharagpur innovation