लासुर्णेमध्ये अवैध धंद्यावर पाेलिसांची कारवाई

lasurne
lasurne

वालचंदनगर : लासुर्णे व जंक्शन (ता.इंदापूर) परिसरामध्ये वालचंदनगर पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारु, गुटखा व बेकायदेशीरपणे घरगुती गॅस चारचाकीमध्ये भरणाऱ्या धंद्यावर कारवाईचा बडगा उगारला.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे व जंक्शन परिसरातील अवैध धंद्याच्या विरोधात वालचंदनगर पोलिसांनी कडक मोहिम उघडली अाहे. बुधवार (ता.२०) रोजी दुपारी अडीच सुमारास गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्या सुमारे सात अड्यावरती पोलिसांनी छापा टाकून पाच मोठ्या हातभट्या उद्धवस्त केल्या. 

यातील काही हातभट्या जमिनीमध्ये अंडरग्राउंड पद्धतीने तयार केल्या होत्या. तसेच बेकायदेशीर गावठी हातभट्ठी दारु विक्री करणाऱ्या पोपट मल्लू बनसोडे व किसन यशवंत लोंढे (रा. दोघे, लासुर्णे) यांच्यावर गुन्हा दाखल करुन दारुचे हजारो लिटर रसायन नष्ट केले. दुपारी तीनच्या सुमारास लासुर्णे येथील संजय धन्यकुमार गांधी यांच्या दुकानावर छापा टाकून १० हजार ६६८ रुपयांचा गुटखा जप्त करुन अन्न व औषध विभागाला कळविण्यात आले आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जंक्शन परिसरामध्ये साईनगर येथे अवैध पद्धतीने घरगुती गॅस चारचाकी गाडीमध्ये भरला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून सुनिल सदाशिव गायकवाड (रा.साईनगर) यांच्यावर कारवाई केली.

गायकवाड याच्याकडून एक आेम्नी चारचाकी गाडी, पाच घरगुती गॅस सिलिंडर,गॅस भरण्याची मशिन, रबरी पाईप असा ८१  हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करुन जीवनावश्‍यक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक रवींद्र पारधी यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. कारवाईमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहाय्यक फौजदार शिवाजी होले, महेंद्र फणसे, रफीक शेख, गणेश काटकर, रुपेश नावडकर, लक्ष्मण साळवे, महिला पोलिस माधुरी लडकत, वंदना लोहकरे यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com