बिबट्याच्या हल्ल्यातील महिलेचा मुत्यू

पराग जगताप 
मंगळवार, 23 जानेवारी 2018

ओतूर ता. जुन्नर - बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मुत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील यावर्षीचा बिबट्याच्या हल्यातील पहिला हा बळी आहे. बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या उसतोडणी करणाऱ्या महिला कामगार सविता भिमराव वायसे वय. 30 रा. माळेगाव, बीड यांचे उपचारादरम्यान आज मंगळवारी पहाटे साडेचार वाजता ससून रुग्णालयात निधन झाले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

त्यांच्या वर हिवरेखुर्द ता. जुन्नर येथील जाधव मळ्यात रविवारी पहाटे साडेपाच वाजता दरम्यान ऊस तोड करताना बिबट्याने प्राण घातक हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावर्षीच्या पहिल्याच महिन्यात जुन्नर तालुक्यातील सविता वायसे यांच्या रुपाने बिबट्याच्या हल्यातील पहिला बळी ठरला असून तालुक्यातील अंदाजे 48 गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून या आधीच वनविभागाने घोषित केली आहे. सविता वायसे यांच्या वारसाला शासकीय नियमानुसार वनविभागाकडून आठ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे वनविभागाच्या सुत्राकडून सांगण्यात आले.

Web Title: marathi news leopard attack women dead